शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी : कोरोनाचा धोका वाढला, उद्धव ठाकरेंनी मोदींना दिवसभरात तीनवेळा फोन केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 12:41 IST

coronavirus in Maharashtra : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यममंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या २४ तासांत तीनवेळा फोन केल्याचे वृत आले आहे. 

मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने आता महाराष्ट्रामध्ये भयावह रूप धारण केले आहे. (coronavirus in Maharashtra) कोरोनाला रोखण्यासाठी कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तरीही रुग्णसंख्येत म्हणावी तशी घट झालेली नाही. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यममंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) गेल्या २४ तासांत तीनवेळा फोन केल्याचे वृत आले आहे.  (Maharashtra CM Uddhav Thackeray calls PM Narendra Modi three times a day on the backdrop of rising corona)

या संदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने प्रसारित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या २४ तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तीनवेळा फोनवरून संपर्क साधला. यावेळी झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, त्यामुळे महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी संपर्क साधला असला तरी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांशी थेट बोलणे झालेले नांही. पंतप्रधान बंगालमध्ये प्रचारासाठी गेल्याने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होऊ शकली नाही, पंतप्रधान बंगालहून परतल्यावर मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधतील, अशी माहिती देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने या चर्चेबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले. 

महाराष्ट्रामध्ये काल पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली. महाराष्ट्रात काल दिवसभरात ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ३९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासातं ४५ हजार ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या आकडेवारीमुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. 

दुसरीकडे देशातही कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. देशभरातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.   शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे  २ लाख ३४ हजार ६९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी ४५ लाखांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ७५ हजार ६४९ वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी १६ लाख ७९ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोना लसीकरण देखील वेगाने होत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र