शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

CoronaVirus News : "मृतांचे आकडे लपवण्यापेक्षा...", प्रियंका गांधींचं योगी आदित्यनाथांना पत्र; केल्या 'या' 10 महत्त्वाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 17:19 IST

Corona Virus Priyanka Gandhi And Yogi Adityanath : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून महत्त्वाच्या दहा सूचना केल्या आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,76,36,307 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही वेगाने कोरोनाचा संसर्ग होत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. राजधानी लखनऊ, प्रयागराज, कानपूर आणि वाराणसी या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेला आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पत्र पाठवून महत्त्वाच्या दहा सूचना केल्या आहेत. प्रियंका यांनी आपल्या पत्रामध्ये राज्यातील रूग्णालयांमध्ये निर्माण झालेला ऑक्सिजन व औषध तुटवड्याचा मुद्दा मांडला आहे

कोरोना चाचण्याचे प्रमाण देखील अतिशय कमी असल्याचं म्हटलं आहे. पत्राद्वारे मुख्यमंत्री योगींना सूचना केल्या असून, यावर विचार केला जावा असा आग्रह प्रियंका यांनी केला आहे. ग्रामीण भागात तर चाचण्या देखील होत नसून, शहरी भागांमध्ये लोकांना चाचण्या करण्यात अनेक अडचणी येत आहेत. अनेक दिवसांपर्यंत रिपोर्ट मिळत नाहीत. 23 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्याच्या सरकारकडे केवळ 126 चाचणी केंद्र आणि 115 खासगी तपासणी केंद्र असल्याचं प्रियंका गांधींनी सांगितलं आहे. तसेच संपूर्ण जगात कोरोनाची ही लढाई चार स्तंभावर टिकून आहे – चाचणी, उपचार, शोध आणि लसीकरण. जर तुम्ही पहिला स्तंभच पाडला तर आपण या जीवघेण्या व्हायरसला कसं काय हरवणार? असं देखील म्हटलं आहे. 

प्रियंका गांधींनी केलेल्या 10 महत्त्वाच्या सूचना 

प्रियंका गांधींनी पत्रामध्ये या महामारीला रोखण्यासाठी आम्ही आपल्या स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील जनतेची शक्य होईल ती सर्व मदत करत आहोत. तुम्हाला तातडीने कारवाईच्या उद्देशाने काही सल्ले देत आहे. मला अपेक्षा आहे की यावर आपण सकारात्मकतेने विचार कराल.

- सर्व आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइ वर्कर्सच्या हितासाठी एक समर्पित आर्थिक पॅकेजची घोषणा केली जावी.

- सर्व बंद करण्यात आलेली कोविड रूग्णालये आणि केअर सेंटर्सना पुन्हा तत्काळ अधिसूचित करावे व युद्धपातळीवर ऑक्सिजनयुक्त बेडची उपलब्धता वाढवावी. प्रादेशिक सेवेतून निवृत्त झालेल्या सर्व वैद्यकीय कर्मचारी, मेडिकल व पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांना त्यांच्या घराजवळील रूग्णालयांमध्ये काम करण्यासाठी बोलावलं जावं.

- कोरोना संसर्ग व मृत्यूचे आकडे लपवण्याऐवजी स्मशान, कब्रस्तान आणि नगरपालिका संस्थांशी चर्चा करून पारदर्शकपणे लोकांना सांगितले जावे.

- आरटीपीसीआर तपासण्याची संख्या वाढवावी. खात्री करावी की कमीत कमी 80 टक्के तपासण्या आरटीपीसीआरद्वरे होतील. ग्रामीण भागात नवी तपासणी केंद्र सुरू करावीत आणि चाचणी कीटची खरेदी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह त्यांची मदत करावी.

- अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामीण भागात औषध व उपकरणांची कोरोना कीट वितरीत केली जावी, जेणेकरून लोकांना योग्य वेळी सुरुवातीसच उपचार व औषधं मिळतील आणि रुग्णालयात जाण्याची वेळच येणार नाही. जीवनावश्यक औषधांच्या काळ्याबाजारावर रोख लावावी.

- ऑक्सिनज साठवण्याचे धोरण त्वरित तयार केले जावे. जेणेकरून आपत्कालीन काळात प्रत्येक जिल्हा मुख्यालयात ऑक्सिजनचा राखीव साठा तयार होऊ शकेल. प्रत्येक ऑक्सिजन टँकरला संपूर्ण राज्यभरात रूग्णवाहिकेचा दर्जा दिला जावा, जेणेकरून वाहतूक सुलभ होईल.

- या संकट काळात निर्बंधांचे घाव सोसणाऱ्या गरीब, मजूर, पथ विक्रेते आणि देशाच्या अन्य राज्यांमधून आपला रोजगार सोडून घरी परतणाऱ्या गरिबांना रोख आर्थिक सहाय्य केलं जावं.

- राज्यात युद्ध पातळीवर त्वरीत लसीकरणास सुरुवात केली जावी. राज्यातील 60 टक्के लोकांचे लसीकरण करण्यासाठी उत्तर प्रदेशला कमीत कमी 10 हजार कोटी रुपयांची आवश्यकता असेल, तर यासाठी राज्याला केवळ 40 कोटी रुपयांचेच वाटप झाले आहेत. यामुळे मी आपल्याला बुलंदशहरातील भारत इम्युनोलॉजिकल अँड बायोलॉजिकल कॉर्पोरेशनमध्ये लस निर्मितीची शक्यता पडताळून पाहण्याचा आग्रह करत आहे.

- कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे वीणकर, कारागीर, छोटे दुकानदार, छोटे व्यवसाय उद्धवस्त झाले आहेत. दुसऱ्या लाटेत त्यांना किमान काही दिलासा, जसं वीज, पाणी, स्थानिक कर आदींमध्ये सवलत दिली जावी, जेणेकरून ते स्वतःला सावरू शकतील.

- ही सर्वांची मदत घेण्याची, सर्वांना मदत करण्याची, सर्वांचा हात धरण्याची वेळ आहे. या वेळी तुमच्या सरकारने लोकं, पक्ष आणि संस्थांना पुढे येण्यासाठी आणि मदत करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतBJPभाजपा