coronavirus: Manmohan Singh writes letter to PM Narendra Modi, gives important advice with increasing vaccination | coronavirus: मनमोहन सिंग यांनी मोदींना पत्र लिहिले, लसीकरण वाढवण्यासह हे महत्त्वाचे सल्ले दिले 

coronavirus: मनमोहन सिंग यांनी मोदींना पत्र लिहिले, लसीकरण वाढवण्यासह हे महत्त्वाचे सल्ले दिले 

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. (coronavirus In India )वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना अनेक सल्ले दिले आहेत. ( Manmohan Singh writes letter to PM Narendra Modi, gives important advice with increasing vaccination)

डॉ. मनमोहन सिंग यांनी या पत्रामधून नरेंद्र मोदींना देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, कोरोना लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. कारण कोरोनाविरोधातील लढाईत ही बाब महत्त्वपूर्ण आहे. तसेच आतापर्यंत किती लोकांचे लसीकरण झाले आहे त्याकडे लक्ष न देता एकूण लोकसंख्येपैकी कीती लोकांचा लसीकरण झाले आहे. यावर लक्ष केंद्रित करण्यात यावे. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लिहिलेले हे पत्र पी. चिदंबरम यांनी शेअर केले आहे. 

सीडब्ल्यूसीच्या बैठकीतील चर्चेदरम्यान मिळालेले सल्ले या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधानांना लिलिहेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लसीकरणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. 

वेगवेगळ्या लसींबाबत सरकारचे काय आदेश आहेत. तसेच पुढच्या सहा महिन्यांमध्ये कोरोनाच्या लसीचा साठा मिळण्याबाबत काय परिस्थिती आहे, हे सरकारने सांगितले पाहिजे. तसेच विविध राज्यांना त्यांना अपेक्षित असलेला लसींचा साठा कसा मिळेल, हे केंद्र सरकारने पाहिले पाहिजे. तसेच राज्यांना फ्रंटलाइन वर्कर्सच्या श्रेणी परिभाषित करण्याची सूट दिली गेली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.  

भारत सरकारने लसनिर्मात्यांना काही अधिकच्या सवलती दिल्या पाहिजेत. इस्राइलप्रमाणे अनिवार्य लायसन्सिंगची व्यवस्था लागू केली पाहिजे. ज्या लसींना युरोपियन मेडिकल एजन्सीने किंवा यूएसएफडीएने मान्यता दिली आहे, अशा लसींची आयात करून त्या उपयोगात आणल्या पाहिजेत. 

दरम्यान, या पत्राबाबत पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये कोरोनाच्या साथीविरोधात लढण्यासाठी पाच महत्त्वपूर्ण सल्ले देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा त्वरित स्वीकार करून पुढील पावले उचलावीत. 

English summary :
Manmohan Singh writes letter to PM Narendra Modi, gives important advice with increasing vaccination

Web Title: coronavirus: Manmohan Singh writes letter to PM Narendra Modi, gives important advice with increasing vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.