शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

coronavirus: "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यातून कोरोना जाणार नाही, ते कोरोनाला जाऊ देणार नाहीत, कारण..."

By बाळकृष्ण परब | Published: February 22, 2021 3:33 PM

Coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. राज्यातील वाढत्या कोरोनावरून आता राजकारणालाही जोर आला आहे.

ठळक मुद्देजो पर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि ते कोरोना जाऊ देणार नाहीतकुठल्या राज्यात कोरोना इतक्या झपाट्याने पसरत नाही, फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्र्यांनाच घरीच बसायला आवडतंराज्यात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाची आकडेवारी वाढली नाही. मात्र अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला?

मुंबई - गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. (Coronavirus in Maharashtra ) त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल राज्यातील जनतेला संबोधित करताना दैनंदिन व्यवहारांवर काही निर्बंध आणण्याची घोषणा केली आहे. तसेच कोरोना वाढल्यास लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यातील वाढत्या कोरोनावरून आता राजकारणालाही जोर आला आहे.  (BJP Leader Nilesh Rane Criticize CM Uddhav Thackeray) भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनीही कोरोनावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (As long as Uddhav Thackeray is the Chief Minister, Corona will not leave the Maharashtra)निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, जगामध्ये उद्धव ठाकरेंसारखा विद्वान माणूस नसेल. जो पर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि ते कोरोना जाऊ देणार नाहीत. कुठल्या राज्यात कोरोना इतक्या झपाट्याने पसरत नाही, फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्र्यांनाच घरीच बसायला आवडतं, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.अजून एका ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, राज्यात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाची आकडेवारी वाढली नाही. मात्र अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला? लॉकडाऊनच्या संकटात लोकांच्या नोकऱ्या, बँकेचे हफ्ते, लाईटबील घेऊनसुद्धा ठाकरे सरकारला अधिवेशनाला जायचं नाही म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन होतेय.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे सहा हजार ९७१ नवे रुग्ण सापडले होते. तर कोरोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, दिवसभरात केवळ २ हजार १४७ रुग्ण बरे झाल्याने कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये ४५१९ रुग्णांची भर पडली होती.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNilesh Raneनिलेश राणे Politicsराजकारण