Coronavirus: माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन; चंद्रपूर जिल्ह्याचं नेतृत्व हरपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 16:02 IST2021-04-25T15:47:23+5:302021-04-25T16:02:19+5:30
आठ दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी सक्करदरा चौकातील श्रीराम हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते

Coronavirus: माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन; चंद्रपूर जिल्ह्याचं नेतृत्व हरपलं
नागपूर : राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे रविवारी दुपारी नागपूर येथे उपचारा दरम्यान नागपूर येथे निधन झाले. हसतमुख, शांत स्वभावी व लोकाभिमुख नेता अशी त्यांची ख्याती होती.
आठ दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी सक्करदरा चौकातील श्रीराम हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू होते. देवतळे यांनी 2014 पर्यंत तब्बल चार वेळा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. 2014 मध्ये मंत्री असतानाच ते लोकसभेची निवडणूक लढले व पराभव झाला. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजप कडून रिंगणात उतरले. मात्र त्यावेळी ही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2019 मध्ये भाजप शिवसेनेची युती झाली. वरोराची जागा सेनेकडे गेली. त्यामुळे देवतळे हे शिवसेनेकडून लढले.यावेळी त्यांना विजय ख्रिस्त आला नाही. शेवटी 22 जानेवारी 2021 मध्ये गडकरींच्या नेतृत्वात त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला होता.