शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पंजाबमधील पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बोलबाला, मतदारांनी भाजपाला असा कौल दिला

By बाळकृष्ण परब | Published: February 17, 2021 11:42 AM

Punjab Local Body Elections Result Live Updates : सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांचे निकाल आता येऊ लागले आहेत.

ठळक मुद्देपंजाबमधील पालिकांच्या आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे शिरोमणी अकाली दल दुसऱ्या स्थानावर आहेभाजपाला शेतकरी आंदोलनाचा फटका बसला असून, भाजपाची मात्र मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे

चंदिगड - सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांचे निकाल आता येऊ लागले आहेत. शेतकरी आंदोलनाचा प्रभाव या निकालांवर दिसून येत असून, सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या रोषाचे केंद्र ठरलेल्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे.पंजाबमधील पालिकांच्या आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. तर शिरोमणी अकाली दल दुसऱ्या स्थानावर आहे. भाजपाला शेतकरी आंदोलनाचा फटका बसला असून, भाजपाची मात्र मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षानेही काही ठिकाणी विजय मिळवण्यात यश मिळवले आहे.

पालिकांचा विचार केल्यास मजिठामध्ये १३ पैकी १० जागांवर अकाली दलाने विजय मिळवला आहे. तरणतारणमधील भिखिविंड नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने ११ तर अकाली दलाने २ जागांवर विजय मिळवला आहे. राजकोटमध्ये १५ पैकी १५ जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. तर जलालाबादमध्ये १७ पैकी ९ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. त्याचप्रमाणे नंगल, लोहियाँ आणि नूरमहल येथेही काँग्रेसची सत्ता आली आहे. राजपूरामध्ये २७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मोगामध्येही काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे.अकाली दलासोबतची युती तुटल्यानंतर प्रथमच एकट्याने निवडणूक लढवणाऱ्या भाजपाची या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली आहे. भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे.

टॅग्स :PunjabपंजाबElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल