शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

टूलकिटवरून पुन्हा जुंपली; संबित पात्रांनी केले आरोप, काँग्रेसकडून खंडन करत FIR ची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 15:48 IST

Congress Vs BJP : संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा. भाजप कोविडच्या मिसमॅनेजमेंटबाबत टूलकितचा बनावट प्रपोगंडा चालवत असल्याचा काँग्रेसचा आरोप

ठळक मुद्देसंबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा. भाजप कोविडच्या मिसमॅनेजमेंटबाबत टूलकितचा बनावट प्रपोगंडा चालवत असल्याचा काँग्रेसचा आरोप

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनावरून सुरु असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना कांग्रेसची एक कथिट टूलकिट दाखवली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अयोग्य शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणायचं आहे. कुंभला सुपर स्प्रेडरप्रमाणे सांगायचं आहे. परंतु ईदला काहीच म्हणायचं नाही," असं पात्रा यांनी कथित टूलकिट दाखवताना म्हटलं. दरम्यान, यावर काँग्रेसनंही स्पष्टीकरण देत हे खोटं असल्याचं म्हटलं. तसंच त्यांनी संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा इशाराही दिला. "भाजप कोविडच्या मिसमॅनेजमेंटबाबत टूलकितचा बनावट प्रपोगंडा चालवत आहे आणि काँग्रेसवर आरोप केले जात आहेत. आम्ही भाजपाचे अध्यक्ष जेपी नज्जा आणि संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहोत. जेव्हा देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे, त्यावेळी हे लोक मदत करण्याऐवजी अशाप्रकारे खोटं पसरवत आहेत," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राजीव गौडा यांनी दिली. 

काय म्हणाले होते पात्रा?"ज्यावेळी इंडियन स्ट्रेनचा उल्लेख होईल त्यावेळी त्याला सोशल मीडिया वॉलेंटियर्सनं मोदी शब्दाचा वापर करावा. जो नवा स्ट्रेन आला आहे त्याला इंडियन स्ट्रेन असा उल्लेख करू नये असं म्हटलं आहे. त्याच्या वैज्ञानिक नावाचा उल्लख करावा. परंतु काँग्रेस कुठे ना कुठे जागतिक आरोग्य संघटनेच्या विरोधात जाऊन त्याला इंडियन स्ट्रेन असं म्हणण्यास सांगितलं आणि त्यापेक्षाही पुझे त्याला मोदी स्ट्रेन असा उल्लेख करण्यास सांगितलं," असं पात्रा म्हणाले. ही अतिशय खेदजनक बाब आहे आणि जगात भारताचा अपमान करण्यासाठी विषाणूच्या स्ट्रेनला भारताच्या नावावर, पंतप्रधानांच्या नावे बोलावण्याचे चेष्टा करण्यात आली आहे. हे काँग्रेसचं खरं रुप दाखवत आहे," असंही ते म्हणाले.  यावेळी संबित पात्रा यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. "जे रोज सकाळी उठून राहुल गांधी जे ट्वीट करत होते आज ती कागदपत्रे माझ्या हाती आली आहेत, ज्याच्या माध्यमातून ते ट्वीट करत होते. यामध्ये मिसिंग अमित शाह, क्वारंटाईन जयशंकर, साईडलाईन राजनाथ सिंग, इनसेन्टिव्ह निर्मला सीतारामन अशा अनेक शब्दांचा वापर करण्यात आलं आहे. काही मासिकांत मिसिंग गव्हर्नंन्स, मिसिंग गव्हर्मेंट अशाप्रकारचे फोटो छापा आणि अखेर मोदींना सारखं सारखं पत्र लिहा असंही लिहिण्यात आलं आहे," पात्रा म्हणाले. 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राcongressकाँग्रेसBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत