शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

"कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल", दिशाच्या अटकेवरून शशी थरूर यांचा मोदी सरकारवर घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:06 IST

Congress Shashi Tharoor And Disha Ravi : फ्रायडे फॉर फ्युचर कॅपेनची दिशा ही एक संस्थापक सदस्य आहे. दिल्ली पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

नवी दिल्ली - बंगळुरू येथील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी (Disha Ravi) या तरुणीला टूलकिट प्रकरणी अटक करण्यात आली आहे. फ्रायडे फॉर फ्युचर कॅपेनची दिशा ही एक संस्थापक सदस्य आहे. दिल्ली पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. दिशा रवीच्या अटकेवरुन आता राजकारण तापू लागलं आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर (Shashi Tharoor)यांनी देखील आता दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. "कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल" असं म्हणत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शशी थरूर यांनी जम्मू-काश्मीरचे निलंबित डीएसपी देविंदर सिंह यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. 

शशी थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. देविंदर सिंह यांच्या फोटोसह दिशाला अटक झाल्याची बातमी सांगणारा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. "कार्यकर्ते तुरुंगात बंद आहेत तर दहशतवादाचा आरोप असलेले जामिनावर बाहेर... आमचे अधिकारी पुलवामा हल्ल्याची आठवण कशी काढतील याचा विचार करताय?… खालच्या दोन शीर्षकांमध्ये उत्तर मिळेल" असं शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुलवामा हल्ल्यातील कटामध्ये देविंदर सिंह यांचं नाव आलं होतं, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आता ते जामिनावर बाहेर आहेत. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी दिशा रवीच्या (Disha Ravi) अटकेचा विरोध केला आहे. यावरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "भारत मूर्खपणाची रंगभूमी बनत चालला आहे" अशा शब्दांत निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला असल्याची घणाघाती टीका देखील चिदंबरम यांनी केली आहे. "जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचं एक टूलकिट भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांपेक्षाही धोकादायक झालं आहे" असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

"जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय" 

"भारत एक मूर्खपणाची रंगभूमी बनत आहे आणि दिल्ली पोलीस अत्याचाऱ्यांचे साधन बनले आहेत, ही खेदाची बाब आहे. मी दिशा रवीच्या अटकेचा तीव्र निषेध करतो आणि सर्व विद्यार्थी आणि तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करतो" असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. बंगळुरूतील सोलदेवानापल्ली परिसरात दिशा वास्तव्याला असून, याच भागातून पोलिसांनी तिला अटक केली आहे. दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

"पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत रडणं म्हणजे उत्तम अभिनयाचं प्रदर्शन" 

शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. राज्यसभेत मोदी भावूक झाले होते त्यावरून थरुर यांनी पंतप्रधानांना टोला लगावला आहे. "पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत रडणं म्हणजे उत्तम अभिनयाचं प्रदर्शन" असल्याचं शशी थरुर यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निरोपादाखल केलेल्या भाषणाच्या वेळी मोदी काही क्षणांसाठी भावूक झाले होते. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचं पुस्तक 'बाय मेनी अ हॅपी अ‍ॅक्सिडन्ट : रिकलेक्शन ऑफ ए लाईफ' यावर आयोजित परिचर्चेत काँग्रेस नेते शशी थरुर सहभागी झाले होते. 'पंतप्रधानांनी राज्यसभेत रडणं म्हणजे उत्तम अभिनयाचं प्रदर्शन' असल्याचं म्हटलं आहे. तसेच 'हे कदाचित राकेश टिकैत (शेतकरी नेते) यांना प्रत्यूत्तर देण्यासाठी करण्यात आलं असावं... पंतप्रधानांना वाटलं असावं की आपल्याकडेही अश्रू आहेत' असं म्हणत शशी थरूर यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटकDisha Raviदिशा रविToolkit Controversyटूलकिट वाद