नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते भेटीच्या वृत्ताचं खंडन करत असताना दुसरीकडे खुद्द अमित शहांनी 'सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगता येत नाही' असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये शहा आणि पवार यांच्या भेटीबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेनं याबद्दल काहीशी सावध भूमिका घेतली असताना काँग्रेसनं मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. (congress raised questions on the meeting between amit shah and ncp chief sharad pawar)यातचं सगळ आलं, पवार-शहा भेटीवर भाजपने अधिकृत भूमिका मांडलीगृहमंत्री जर देशातल्या एखाद्या मोठ्या नेत्याला भेटत असतील, तर त्यांना याबद्दल देशाला सांगायला हवं. त्या भेटीत नेमकं काय झालं, हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, असं काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी म्हटलं आहे. अमित शहा आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली असेल, तर त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, असं दीक्षित म्हणाले.‘ती’ भेट झालीच नाही, पवार-शहा भेटीची नुसतीच चर्चा, राष्ट्रवादीकडूनही खंडनअमित शहा आणि शरद पवार यांची अहमदाबादमध्ये भेट झाल्याचं वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्रानं दिलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मात्र भेटीचं वृत्त फेटाळून लावलं. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल गृहमंत्री अमित शहांना भेटल्याच्या वृत्ताची चर्चा आहे. गेल्या २ दिवसांपासून ट्विटरवर तशा अफवा उडवल्या जात आहेत. मात्र अशी कोणतीही भेट झालेली नाही, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.
"अमित शहाजी, शरद पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली, जरा देशाला सांगा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 14:50 IST