"निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरू"; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 11:31 AM2021-05-06T11:31:39+5:302021-05-06T11:36:16+5:30

Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Petrol Diesel Price Hike : इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Petrol Diesel Price Hike | "निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरू"; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

"निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरू"; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

Next

नवी दिल्ली - मे महिना उजाडताच उन्हाबरोबर महागाईचे चटकेदेखील बसायला सुरुवात झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol-Diesel Price) वाढ केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. 4 मे रोजी पेट्रोलच्या किंमतीत 15 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 18 पैशांची वाढ झाली. यानंतर 5 मे रोजी पेट्रोलच्या किंमतीत 19 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 21 पैशांची वाढ झाली. ही वाढ 65 दिवसांनी झाली होती. या काळात 4 वेळा इंधनाचे दर कमी करण्यात आले होते. परंतू, निवडणुकांचा मौसम असल्याने कच्च्या तेलाचे दर वाढूनही किंमती वाढविण्यात आल्या नव्हत्या. याच दरम्यान इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून राहुल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याचं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरू" असं ट्वीट केलं आहे. तसेच त्यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती (PetrolDieselPriceHike) असा हॅशटॅग देखील वापरला आहे. देशाच्या राजधानीमध्ये आज 6 मे 2021 रोजी पेट्रोलच्या दरात 52 पैसे आणि डिझेल 30 पैसे एवढी वाढ झाली आहे. यामुळे आज दिल्लीतील पेट्रोलचा दर हा 90.99 रुपये आणि डिझेलचा दर 81.42 रुपये प्रति लीटर झाला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 97.34 रुपये आणि डिझेलची किंमत 88.49 रुपये प्रति लीटर झाली आहे. 

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर 27 फेब्रुवारीपासून 66 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढविण्यात आले नव्हते. याआधीची शेवटची दरवाढ 15 एप्रिल रोजी झाली होती. या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर घसरला. त्यामुळे सध्या कंपन्यांना इंधनांच्या विक्रीवर प्रतिलिटर सुमारे 3 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. महिनाभरापूर्वी कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी डॉलरच्या तुलनेत विनिमय दर 72.59 रुपये होता. तो आता 74.18 रुपये झाला आहे. त्यातच कच्च्या तेलाचे दर 8 डॉलरने वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर मंगळवारी 67.64 डॉलर प्रतिबॅरल होते. भारतात वापरल्या जाणाऱ्या खनिज तेलापैकी 80 टक्के तेल आयात केले जाते. 

"अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्या"

कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर याआधी अनेकदा हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता राहुल यांनी केंद्र सरकारकडे एक विनंती केली होती. "अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्या" असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती आहे की पीआर व अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे संकट आणखी गंभीर होईल, याला तोंड देण्यासाठी देशाला तयार करायला हवं. सध्याची दुर्दशा असहनीय आहे" असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

 "केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

"केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगा लावणार. संपत्ती, आरोग्य आणि आपला जीव गमावणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार" असं राहुल गांधी यांनी म्हटलं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तसेच "केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. 

Web Title: Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Petrol Diesel Price Hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app