शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

Corona Vaccination : "मंत्र्यांची संख्या वाढली पण कोरोना लसीची नाही"; राहुल गांधींचा मोदी सरकारला सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 8:19 AM

Congress Rahul Gandhi Slams Modi Government : राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांवर पोहोचला आहे. काही राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. आता राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

"मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही!" असं म्हणत कोरोना लसी कुठं आहेत असा सवालही त्यांनी केला. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये देशातील कोरोना लसीकरणासंदर्भातील आकडेवारी देण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी डिसेंबर 2021 पर्यंत देशात 60 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीकरणाचे 2 डोस देणं आवश्यक आहे असं म्हटलं आहे. 

दररोज किमान 88 लाख जणांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. मात्र मागील 7 दिवसांत दररोज सरासरी केवळ 34 लाख जणांनाच लसीकरण केलं जात आहे. दुसरीकडे गेल्या 7 दिवसांत दररोज सरासरी 54 लाख लसींचा तुटवडा आहे अशी माहिती राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आहे. "केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही... शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार" असं म्हणत काही दिवसांपूर्वी राहुल यांनी टीकास्त्र सोडलं होतं. "केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगा लावणार. संपत्ती, आरोग्य आणि आपला जीव गमावणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

"तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं"; राहुल गांधींचा घणाघात 

कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे.  याच दरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून जोरदार निशाणा साधला आहे. "तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं" अशा शब्दांत राहुल यांनी बोचरी टीका केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी