Parliament: “राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करा, संसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका”; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 02:34 PM2021-07-29T14:34:04+5:302021-07-29T14:35:57+5:30

Parliament: आताच्या घडीला केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधक संसदेचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

congress rahul gandhi says do not waste time of parliament and discuss on national interest issue | Parliament: “राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करा, संसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका”; राहुल गांधींची टीका

Parliament: “राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करा, संसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका”; राहुल गांधींची टीका

googlenewsNext
ठळक मुद्देराहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्रसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नकामोदी सरकार विरोधकांना काम करू देत नसल्याचा दावा

नवी दिल्ली:संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातही महागाई, इंधनदरवाढ, पॅगेसस हेरगिरी, केंद्रीय कृषी कायदे, शेतकरी आंदोलन प्रकरणी विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात टीकास्त्र सोडले जात असून, गोंधळामुळे अनेकदा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले आहे. आताच्या घडीला केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधक संसदेचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करावी. संसदेचा आणखी वेळ फुकट घालवू नये, या शब्दांत टीका केली आहे. (congress rahul gandhi says do not waste time of parliament and discuss on national interest issue) 

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. मोदी सरकारने पेगॅसस खरेदी केले की नाही आणि पेगॅसस हत्याराचा वापर आपल्याच लोकांविरुद्ध केला की नाही, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

“मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते”

संसदेचा वेळ वाया घालवू नका

खासदारांनी जनतेचा आवाज बनून राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे, असा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. मोदी सरकार विरोधकांना हेच काम करू देत नाही. संसदेचा आणखी वेळ वाया घालवू नका. महागाई, शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस हेरगिरीवर चर्चा करावी, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. याआधी पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचे म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. 

राहुल गांधींची हेरगिरी कोण कशाला करेल?

राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेस मूळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींची हेरगिरी कोण कशाला करेल? त्यांच्याकडून तर काँग्रेस पक्षही सांभाळला जात नाही, असा टोलाही पात्रा यांनी लगावला. राहुल गांधी यांनी एकदा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हातातून ज्या प्रकारे कागदपत्रे फाडली होती, तसेच काहीसे त्यांच्या सहकाऱ्यांनी संसदेत केले, असा चिमटाही संबित पात्रा यांनी काढला.
 

Web Title: congress rahul gandhi says do not waste time of parliament and discuss on national interest issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.