"मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली" 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 08:08 PM2021-06-23T20:08:45+5:302021-06-23T20:11:37+5:30

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर अनेकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine | "मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली" 

"मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली" 

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून (Corona Vaccine) मोदी सरकारवर अनेकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. "मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट" अस म्हणत प्रियंका यांनी बोचरी टीका केली आहे. 

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "डेल्टा प्लस व्हेरिएंट देशात दाखल झाला आहे. मात्र आत्तापर्यंत फक्त 3.6 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. पण पंतप्रधान मात्र इव्हेंट मॅनेजरच्या भूमिकेत दिसत आहेत. मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये तब्बल 40 टक्क्यांची घट झाली आहे" असं प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारच्या विक्रमी लसीकरणाचा फॉर्म्युला असं म्हणत मध्य प्रदेशमधील आकडेवारी देखील दिली आहे.

"विक्रमी लसीकरणाचा फॉर्म्युला... मध्य प्रदेश 20 जून – 692 नागरिकांना लसीकरण. 21 जून – 16 लाख 91 हजार 967 जणांना लसीकरण. 22 जून – 4 हजार 825 नागरिकांना लसीकरण. लसी जमा केल्या, इव्हेंटसाठी एका दिवसात लसी दिल्या आणि पुन्हा पुढच्या दिवशी लसीकरण कमी झालं. डिसेंबरपर्यंत सगळ्यांना लस देण्यासाठी देशात दररोज 80 ते 90 लाख लोकांचं लसीकरण करायला हवं" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी कोरोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार आहे तर लसींच्या किंमतीत भेदभाव का? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला होता.

"केंद्र सरकार भारतातील तीन टक्के लोकसंख्येचंही लसीकरण पूर्ण करू शकलेलं नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारने लस वितरण व्यवस्था आणखीन मजबूतीनं आपल्या हाती घेण्याची गरज होती, मात्र या वेळेस सरकारने आपल्या जबाबदारीतून हात झटकले आणि लस वितरणाची जबाबदारी राज्यांवर ढकलली" असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला होता. तसेच "सरकारकडून डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु, यासाठी प्रत्येक दिवशी 70-80 लाख लसीचे डोस देण्याची कोणतीही योजना सरकारनं देशासमोर ठेवलेली नाही. कोरोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार असेल तर लसींच्या किंमतीत भेदभाव का? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का?" असा शब्दांत प्रियंका यांनी निशाणा साधला होता.

Web Title: Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.