शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

शिवसेनेत काँग्रेसी राजकारण...; मनसेला रामदास कदमांच्या कथित क्लिप पुरवल्या कोणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 8:00 AM

Shivsena: दुश्मनांना तुम्ही एखादवेळी सहज संपवाल, पण आपल्यांचा त्रास खूप मोठा असतो. शिवसेनेला तो अनुभव सध्या येत आहे.

यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

काँग्रेसला पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष नाही म्हणून चेष्टेनं तिला हेडलेस आर्मी म्हणतात. पक्षातलेच जुनेजाणते नेते नेतृत्वाबद्दल उघड नाराजी व्यक्त करत असतात. तिकडे पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या आठवड्यात बराच घोळ झाला. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खूप काही समन्वय आहे असं नाही. संधी मिळेल तिथे एकमेकांबद्दल तक्रारी करण्यात ते अजूनही धन्यता मानतात. एकमेकांना निपटवण्यातच त्यांना फुशारकी वाटते. पण तरीही  काँग्रेस आहे कुठे, काँग्रेस तर संपली असं म्हणणाऱ्यांना कालच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानं उत्तर हेच दिलंय की, ‘भाऊ ! ही काँग्रेस आहे... संपत नाही बरं !! नेत्यांना कसंही वागू द्या, लोकांच्या मनातून काँग्रेस जात नाही, हेच खरं ! जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसच्या जागा वाढल्या अन् पंचायत समित्यांमध्ये तर काँग्रेस ३६ जागा जिंकून क्रमांक एकवर आहे. बरेच विद्वान असा तर्क देतात की तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वात मोठं नुकसान काँग्रेसचं होईल, पण इथे फायदा झालेला दिसतो. राज्यातील तळाच्या पक्षानं मिळवलेलं हे यश आहे. कच्चं लिंबू समजले त्यानं मॅच जिंकली. राष्ट्रवादी जसं त्या-त्या भागातील आपल्या सरदारांना बळ आणि निर्णय स्वातंत्र्य देते, तसं काँग्रेसनं केलं तर आणखी यश मिळेल. कोणासोबत कोण गेल्यानं कोणाचं नुकसान झालं याचं गणित आताच केलेलं बरं.

भाजपच्या जिल्हा परिषदेच्या जागा कमी झाल्या, पण तरीही इतरांपेक्षा अव्वल असल्यानं, ‘आम्हीच नंबर वन’ असं त्यांना सांगता आलं. गावित घराणं विरुद्ध भाजप संघटना असं चित्र असल्यानं भाजपला नंदुरबारमध्ये फटका बसला. अकोल्यात भाजपच्या चार बड्या नेत्यांची तोंडं चार दिशांना आहेत. तिथे भविष्यात पक्षाला आणखी फटका बसेल. नागपुरात मंत्री सुनील केदार मित्र बावनकुळेंवर भारी पडले. धुळ्यात भाजपअंतर्गत सुंदोपसंदी अन् महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र असल्यानं भाजपच्या जागा कमी झाल्या. यावेळी भाजप काठावर पास झाला. झालेल्या चुका, अंतर्गत राजीनाराजीचं आत्मपरीक्षण पक्षाला करावं लागेल.

चालू वर्षाअखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू होत असताना सत्तेतील तीन पक्षांनी एकत्र लढावं की स्वतंत्र याची ही ‘लिटमस टेस्ट’ होती. नुसतं एकत्र लढून चालणार नाही, एकमेकांसाठी त्याग अन् मनापासून प्रचारही केला तर जिंकता येईल, हे काँग्रेसच्या आमदार कुणाल पाटलांनी धुळ्यात दाखवलं. कालच्या पोटनिवडणुकीला राज्याचे नाही तर स्थानिक संदर्भ होते हे खरं असलं तरी निकालाचा बारकाईनं अभ्यास केल्यास मतदारांचा कल कळू शकतो. धुळे वगळता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले. आपण क्रमांक एकवर राहिलो या समाधानावरच भाजप राहणार असेल तर त्यांना फार पुढे जाता येणार नाही. राज्यात सर्वाधिक आमदार असूनही  भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलंच आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होण्याचा धोका अधिक !घर का भेदी लंका ढाए परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविषयीची बरीच माहिती माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याचा आरोप होत आहे. त्या संबंधी काही ऑडिओ क्लिप मनसेच्या नेत्यांनी व्हायरल केल्या. शिवसेनेत एकमेकांविरुद्ध काड्या करण्याचं काँग्रेस मॉडेलचं राजकारण सुरू झालेलं दिसतं. आता प्रश्न हादेखील आहे की मनसेवाल्यांना कदमांच्या कथित क्लिप पुरवल्या कोणी? कदम मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत आणि त्यांची मुदत दोन महिन्यांनी संपतेय. तिथे त्यांचा पत्ता साफ करण्यासाठीचं आयतं कोलित कदमांच्या विरोधकांना मिळालं. दुश्मनांना तुम्ही एखादवेळी सहज संपवाल, पण आपल्यांचा त्रास खूप मोठा असतो. शिवसेनेला तो अनुभव सध्या येत आहे. खासदार भावना गवळींबद्दलचे पुरावे वाशिममध्ये तीस वर्षांपासून कट्टर शिवसैनिक असलेले हरिश सारडा यांनी सोमय्यांना पोहोचवले होते. ते हायकोर्टातही गेले. शिवाय, भावनाताईंचे माजी पीए, सीए दुखावले अन् माहिती फोडली गेली. परवा ईडीने त्यांच्या खास माणसाला अटक करून चौकशी केली तेव्हा, ‘माझा काही दोष नाही, ताईंच्या सांगण्यावरून मी सगळं काही केलं’ असं त्यानं सांगून टाकल्याच्या बातम्या छापून आल्या. 

बुडायला लागलेली माकडीण पिलाच्या डोक्यावर बसून बाहेर पडते म्हणतात. अनिल देशमुखांबाबत तसंच झालं. आपल्याला वाचवतील असं त्यांना ज्यांच्याबाबतीत वाटत होतं ते त्यांच्या अंगावर पाय ठेवून निघून गेले. आमदार प्रताप सरनाईकांबाबत खोलात गेलात तर धक्कादायक माहिती मिळेल. छगन भुजबळ यांच्या संस्थेतील त्यांच्याजवळच्या माणसांनीच त्यांना अडचणीत आणलं होतं. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबतही निकटस्थांनी धोका दिल्याची माहिती मिळतेय. दोन बैठकी एका बड्या हॉटेलमध्ये झाल्या होत्या म्हणतात. 

शेल कंपन्यांमध्ये पैसा वळता करून तो देणग्या आदींच्या रूपाने आपल्याशी संबंधित ट्रस्टमध्ये वळता करायचा ही ‘मोड्स ऑपरेंडी’ बऱ्याच राजकारण्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये वापरली. त्यातले काही आता चांगलेच अडचणीत आले आहेत आणि नजीकच्या काळात आणखी काही जण अडचणीत येतील. त्यामुळे गैरव्यवहारांची ‘मोड्स ऑपरेंडी पुढच्या काळात बदलावी लागणार आहे. गुरुवारी पडलेल्या आयकर छाप्यांची झळ बड्या राजकीय घराण्याला पहिल्यांदाच बसत आहे. पहाटेच्या शपथविधीतील जोडीदार राहिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार अन् त्यांचे जवळचे नातेवाइक अडचणीत आलेले आहेत. आता या छाप्यांमध्ये काही घबाड मिळतं का, खरंच कोट्यवधींचे काही गैरव्यवहार समोर येतात का ते पहायचं. काहीच समोर आलं नाही तर शरद पवार ‘जालियनवाला बाग’ वगैरे जे बोलले त्याचा या छाप्यांशी काही संबंध होता का याची चर्चा नक्कीच रंगेल !

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमMNSमनसेShiv Senaशिवसेना