शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील काँग्रेस ही राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली : राधाकृष्ण विखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 11:15 IST

राज्यातील काँग्रेस ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे.

श्रीरामपूर : राज्यातील काँग्रेस ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. राज्यातील काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे. काँग्रेससाठी ज्यांनी काहीच काम केले नाही ते आता काँग्रेस उभी करायला निघाले आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्या वस्तीवर आयोजित केलेल्या ससाणे समर्थकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिर्डी मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय समर्थक आज जाहीर करणार आहेत.विखे म्हणाले, ही राजकीय लढाई आपल्या अस्तित्वाची व अस्मितेची आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागा. कार्यकर्त्यांनी कुठल्याही आमिषाची अपेक्षा ठेवू नये. काँग्रेस पक्षाने माझ्यावर कारवाई करावी यासाठी काही जण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. ज्या पक्षासाठी मी पाच वर्षे संघर्ष केला, सरकार विरोधी भूमिका घेतली तो पक्ष माझ्यासोबत नाही राहिला, तो तुमच्या मागे कधी राहील, असा सवाल विखे यांनी यावेळी उपस्थित केला.राहाता तालुक्यातील गावांमध्ये गुरुवारी प्रचार करणार आहे. त्यावेळी राजकीय भूमिका स्पष्ट करू. करण ससाणे यांच्याशी भेटून चर्चा करणार आहे. जयंत ससाणे यांच्या निधनानंतर हा कार्यकर्त्यांचा गट अभेद्य राहिला. मेळाव्यातील गर्दीतून ताकद दिसत आहे. कुठल्याही साखर कारखाना, संस्थाशिवाय मजबूत संघटन उभे आहे. मी स्वत: ससाणे यांच्या कार्यालयात नेहमी भेट देऊन अडचणी सोडवणार आहे. ससाणे यांना राजकीय ताकद देऊ, असे ते म्हणाले.

दरम्यान, ससाणे समर्थकांनी काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय यावेळी घोषित केला. विखे यांनी कार्यकर्त्यांना राजकीय निर्णय घेण्याविषयी सांगताच उपस्थितांमधून जय महाराष्ट्रच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावर तुमच्या मनात काय आहे हे मला माहीत आहे, असे सांगितले.
ससाणे समर्थक संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, ज्ञानेश्वर मुरकुटे, नानासाहेब पवार, संजय छल्लारे, सुधीर नवले, भारती कांबळे, मुक्तार शाह, आंबेडकरी चळवळीतील नेते अशोक गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. ससाणे समर्थकांनी काँग्रेस उमेदवार कांबळे यांच्याविरोधात काम करणार असल्याची भूमिका जाहीर केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे हे मेळाव्यास अनुपस्थित होते. विखे हे आज ससाणे यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019ahmednagar-pcअहमदनगर