शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: "मोदी सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे नमामी गंगेचं रुपांतर शवामी गंगेत झालंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 20:22 IST

CoronaVirus News: काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची मोदी सरकारवर जोरदार टीका

चंद्रपूर: देशामध्ये कोरोनाच्या काळात विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी नमामी गंगे अभियान सुरू केलं होतं. मात्र आता परिस्थिती 'शवामी गंगे' अशी झाली आहे, अशी टीका चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून गंगा नदीमधून मृतदेह वाहून येत आहेत. ते कोरोना रुग्णांचे असल्याचा संशय बिहारच्या बक्सरमधील नागरिकांना आहे. याबद्दल भाष्य करताना धानोरकर यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.

विनापास प्रवास करणाऱ्या पृथ्वी शॉला आंबोलीत रोखलं; पास आल्यानंतर तासाभरानं सोडलं

आज गंगा नदीवर ४० टक्के लोकांचं जीवनमान अवलंबून आहे. जगाच्या नकाशावर सांस्कृतिक व पवित्र नदी असा उल्लेख आहे. आज ७ वर्षाच्या मोठा कालखंड लोटूनदेखील केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळे व नियोजनशून्य कामामुळे नमामी गंगेचे शवामी गंगेत रूपांतर झाल्याचे दिसून येते. नदीच्या पात्रात शेकडो मृतदेह वाहत येत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भारताची मान शरमेनं खाली गेल्याचं खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटलं. हा संपूर्ण भारतवासियांचा जगभरात झालेला अपमान आहे. कोरोना विरोधी लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सूचनांना सामावून घेण्याचं आवाहनही खासदार बाळू धानोरकर यांनी केलं.

येत्या आठवड्यापासून भारतात मिळणार स्पुटनिक व्ही लस; जुलैमध्ये देशात सुरू होणार उत्पादन

२०१४ रोजी भारतातील प्रदूषित गंगा नदी आपण स्वच्छ करू त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगे असा कार्यक्रम राबवला. २०१५ मध्ये भाजप सरकारने या नदीच्या पंचवार्षिक स्वच्छता योजनेसाठी २० हजार कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिले होते. मोदींचा वाराणसी मतदारसंघात गंगेच्या तीरावरील एक महत्वाचं यात्रास्थळ आहे. तिथे देखील अशीच विदारक परिस्थिती आहे.  

गाझीपूरमध्ये मृतदेह वाहून जात आहेत. तर उन्नावमध्ये नदी किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले जात आहेत. लखनऊ, गोरखपूर, झांरी, कानपूर, अशा शहरांमधील मृत्यूचा आकडा अनेक पटींनी कमी करुन सांगितला जातोय. उत्तर प्रदेशात मर्यादा ओलांडून अमानवतेचं दर्शन होत आहे. सरकार आपली प्रतिमा बनवण्यात व्यस्त आहे आणि जनतेचं दु:ख असह्य बनत चाललं आहे. त्यामुळे जगात देशाचे नाव चुकीच्या पद्धतीने जात आहे. कोरोनाच्या उपायोजना करण्याकरिता विरोधी पक्षाच्या सूचना देखील विचारात घ्याव्या, कोरोनाविरुद्धची लढाई ही फक्त भाजपाची नसून सर्वांची आहे. त्यामुळे या लढाईत राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्यावे अशी विनंती महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी