शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

"शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत"; थेट सोनिया गांधींनाच पाठवलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 12:33 PM

Congress : आपले सहकारी पक्ष रणनीती आखून आपल्या पक्षाला नुकसान पोहोचवत असून स्वत:चा पक्ष पुढे नेण्याचं काम करत आहेत. हे थांबवण्यासाठी आपण अपयशी ठरत असल्याचंही विश्वबंधू राय यांनी पत्रात नमूद केलं आहे.

ठळक मुद्देवर्षभरात काय गमावलं काय मिळवलं या विषयावर सोनिया गांधींना मुंबई काँग्रेस महासचिवांचं पत्रसरकार चालवण्याच्या भूमिकेत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं दिसत असल्याचाही पत्राद्वारे आरोप

राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील काँग्रेसचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मुंबई काँग्रेसचे महासचिव आणि माजी खासदार संजय निरूपम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विश्वबंधू राय यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच या पत्रात राज्यात काँग्रेसला बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस पक्षानं काय मिळवलं आणि काय गमावलं असं म्हणत त्यांनी काही मुद्दे या पत्राद्वारे सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे.महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या एका वर्षात काँग्रेस पक्ष सरकारमध्ये एक सहयोगी पक्ष म्हणूनच राहिला आहे. महाराष्ट्रात सरकार चालवण्याच्या भूमिकेत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप विश्वबंधू राय यांनी केला आहे.महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेस पक्षातील अनेक मंत्री संघटनेच्या कोणत्याही कामासाठी मदतीस येत नाही. सामान्य जनता आणि पक्षा कार्यकर्त्यांना मंत्र्यांच्या विभागाबद्दलही माहिती नाही. महाराष्ट्रात सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी राज्यातील अनेक विभाग, मंडळं आणि आयोगांवरील पद रिक्त आहेत. त्यावर आतापर्यंत नियुक्ती करण्यात आलेली नाही. आपले सहकारी पक्ष रणनीती आखून आपल्या पक्षाला नुकसान पोहोचवत असून स्वत:चा पक्ष पुढे नेण्याचं काम करत आहेत. हे थांबवण्यासाठी आपण अपयशी ठरत आहोत, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस पक्षाद्वारे देण्यात आलेल्या आश्वासनांवर कोणतंही काम केलं जात नाही. सर्व आश्वासनं तशीच राहिली असून आता एका वर्षाचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे. आपली मतं आपले सहकारी पक्ष आणि विरोधी पक्षा त्यांच्याकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहेत. पक्षातून अन्य पक्षात होणारे प्रवेश थांबवण्यासाठीही काही पावलं उचलणं आवश्यक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही आघाडीच्या नियमांवर चालण्याच्या सूचना देणं आवश्यक असल्याचं विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र