शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांकडून मराठा समाजाची फसवणूक: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 19:53 IST

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा घटना दुरुस्तीनंतर करण्यात आला असून मराठा समाजाचा घात देवेंद्र फडणवीसांनी केल्याचा पटोलेंचा आरोप

ठळक मुद्देमराठा समाजाचा घात देवेंद्र फडणवीसांनी केल्याचा पटोलेंचा आरोपभाजप आणि फडणवीसांचा दावा खोटा हे सुनावणीदरम्यान स्पष्ट, पटोले यांचं वक्तव्य

"मराठा समाजाला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आरक्षण दिले. पण ते महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात टिकवता येत नाही, अशी ओरड भाजपाकडून वारंवार करण्यात येत आहे. परंतु भाजप व देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोटा असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान उघड झाले आहे," असं म्हणत काँग्रेसेचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 

सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षणासंदर्भात कुठलेही अधिकार राहिलेले नाहीत असे स्पष्ट केले. मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा हा या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही शुद्ध फसवणूक असून मराठा समाजाचा घात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांनी केंद्राला सांगून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे," अशी मागणीही पटोले यांनी केली."काँग्रेस पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असून त्यासंदर्भात मोठ्यातले मोठे वकील लावायचे असल्यास सरकारने लावावे व मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आग्रही भूमिका घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावरील राजकारण थांबवून केंद्रातील आपल्या पक्षाच्या सरकारला सांगून ठोस भूमिका घ्यावी व मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. मराठा आरक्षणाचा गुंता हा भारतीय जनता पक्षानेच वाढवून ठेवला आहे. हे ८ मार्चला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतून उघड होत आहे. सामाजिक आणि आर्थिक मागास जातींना संविधानातील तरतूदीनुसार न्याय देण्यासाठी मागासवर्गीय आयोग नेमून कायदा करण्याचा राज्यांचा अधिकारच केंद्र सरकारने काढून घेतला आहे हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना आरक्षणच संपुष्टात आणावयाचे आहे हे लपून राहिलेले नाही. त्यासाठी अशी षडयंत्रे रचली जात आहेत. असा आरोपही पटोले यांनी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय