“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 07:38 PM2021-06-13T19:38:10+5:302021-06-13T19:39:54+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर दिला असून, भाजपला दुसरा सशक्त पर्याय नाही, अशी कबुली दिली आहे.

congress kapil sibal says country needs a strong credible opposition | “होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली

“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली

Next
ठळक मुद्देकपिल सिब्बल यांचा पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा अहेरज्येष्ठ आणि युवा यांमध्ये समन्वय साधण्याची गरजभाजपसमोर काँग्रेसच उत्तम पर्याय म्हणून उभा राहू शकतो - सिब्बल

नवी दिल्ली: पुढील काही महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. भाजपने आतापासून या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राहुल गांधींच्या जवळचे मानले जाणारे जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर प्रदेशमधील राजकारणात खळबळ उडाली. यानंतर काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर दिला असून, भाजपला दुसरा सशक्त पर्याय नाही, अशी कबुली दिली आहे. (congress kapil sibal says country needs a strong credible opposition)

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाची वाटचाल आणि अन्य गोष्टींबाबत स्पष्ट विचार मांडले आहेत. काँग्रेस नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून  पक्षांतर्गत अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत सिब्बल यांनी व्यक्त केले आहे. 

“नाना पाटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला

भाजपला सशक्त पर्याय नाही

आताच्या घडीला देशात भारतीय जनता पक्षाला सशक्त पर्याय नाही, याची कबुली देत सिब्बल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कार्यभार हाकण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे. भाजपसमोर काँग्रेसच एक उत्तम पर्याय म्हणून उभे राहू शकते, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला आहे. तसेच देशाला मजबूत, विश्वासार्ह विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाने आपली सक्रीयता ही दाखवून देण्याची वेळ आली आहे. काँग्रेस पक्षाला संघटनात्मक निवडणुका घेण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर व्यापक सुधारणा घडवण्याचीही आवश्यकता आहे. याशिवाय पक्षातील ज्येष्ठ नेते आणि युवा नेते यांच्यात योग्य समन्वय साधण्याची गरज आहे, असे कपिल सिब्बल यांनी नमूद केले. 

दुसऱ्यांचे ऐकल्याशिवाय काहीही टिकू शकत नाही

यापूर्वीही कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाच्या काही गोष्टींवर आक्षेप नोंदवला होता. मला खात्री आहे की, नेमकी समस्या काय आहेत, याची नेतृत्वाला माहिती आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे आहे की, नेतृत्व लोकांचे ऐकेल. कारण ऐकल्याशिवाय काहीही तग धरू शकत नाही. पक्षांतर्गत समस्यांचे निराकरण केले गेले नाही हे खरे आहे. या समस्यांची शक्य तितक्या लवकर दखल घेतली गेली पाहिजे, या शब्दांत कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वाचे अप्रत्यक्षरित्या कान टोचले आहेत. 

“... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण

दरम्यान, काँग्रेसने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष व्हायला हवे. त्यासाठी पुनर्रचना करणे गरजेचे आहे. पक्षप्रमुखाने ऐकलेच नाही किंवा ऐकणे सोडून दिले, तर संघटना कोसळेल. पक्षाने आमचे ऐकावे, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे सांगत तुम्ही जर ऐकले नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल, असा सूचक इशाराही सिब्बल यांनी दिला.
 

Web Title: congress kapil sibal says country needs a strong credible opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.