शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

पुण्यात दोन दिवस राजकीय धुळवडीचे : रथी महारथी लावणार हजेरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 17:04 IST

लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेतही पुणेकरांनी भाजपला साथ दिली आणि तोच निकाल महापालिका निवडणुकात कायम दिसला. त्यामुळे भाजपला गड राखण्यासाठी आणि इतराना अस्तित्व टिकवायला पुण्याचे आव्हान आहे.

पुणे : सध्या शत-प्रतिशत भाजपचे राज्य असलेल्या पुणे शहरात इतर राजकीय पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी लढताना दिसत आहे. लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेतही पुणेकरांनी भाजपला साथ दिली आणि तोच निकाल महापालिका निवडणुकात कायम दिसला. त्यामुळे भाजपला गड राखण्यासाठी आणि इतराना अस्तित्व टिकवायला पुण्याचे आव्हान आहे. याच कारणामुळे येणाऱ्या काही महिन्यात शहरात अनेक नेत्यांच्या वाऱ्या, उदघाटनांचे कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे यांची रेलचेल दिसणार आहे. 

       याची सुरुवातही झाली असून येत्या शुक्रवार आणि शनिवारी शहरात भाजप आणि काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते पुण्यात असणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे कार्यकर्त्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यासाठी तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण जनसंघर्ष सभेसाठी पुण्यात असणार आहेत. त्यामुळे उद्या आणि परवाचा दिवस राजकीय वक्तव्य आणि घडामोडींनी भरलेला असेल यात शंका नाही.शहा पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याच्या क्लुप्त्या सांगणार असून काँग्रेसतर्फे मात्र जनसंघर्ष यात्रेपाठोपाठ सभा घेण्यास पुण्यापासून सुरुवात केली जाणार आहे. अर्थात लोकसभेची जागावाटणी पूर्ण झाली नसल्याचे काँग्रेसची सभा म्हणजे शक्ति प्रदर्शन असल्याचे म्हटले जात आहे.

          मागील आठ्वड्यात राष्ट्रवादीने घेतलेल्या सभेनंतर काँग्रेसची सभा कशी होणार याविषयी उत्सुकता आहे.  दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत वातावरण दिसते तेवढे आलबेल नसल्यामुळे अंतर्गत भांडणांची आणि तक्रारींची दखल शहा घेणार का असाही सवाल आहे. शिवाय दोनही पक्षात निवडणूक लढवण्यापासून ते उमेदवार कोण असणार अशा सर्व मुद्द्यांवर साशंकता असल्यामुळे या कार्यक्रमांना महत्व प्राप्त झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAmit Shahअमित शहाAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा