"Conditions for holding mid-term elections in the state"; BJP leader Chandrakant patil claims | “राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा

“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा

ठळक मुद्देराज्यात सध्या मध्यावधी निवडणुकीसारखी परिस्थिती आहे, मध्यावधी निवडणुका कुठल्याही पक्षाला नकोएक निवडणूक लढणं, पक्षाला आणि उमेदवाराही अवघड असतं, अनिश्चितता राहतेभाजपामधून ज्यांना बाहेर पडायचं त्यांना रोखण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत - राष्ट्रवादी

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्यासाठी बोलणी सुरु झाल्याचं म्हटलं जातं. मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ही भेट राजकीय नसून सामनाच्या मुलाखतीसाठी होती असं सांगितलं आहे. परंतु युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच या दोन्ही नेत्यांची तब्बल २ तास भेट झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

यातच राज्यात सध्या मध्यावधी निवडणुकीसारखी परिस्थिती आहे, मध्यावधी निवडणुका कुठल्याही पक्षाला नको, एक निवडणूक लढणं, पक्षाला आणि उमेदवाराही अवघड असतं, अनिश्चितता राहते, शेवटी कोणाची तडजोड झाली नाही तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. आगामी निवडणूक भाजपा स्वबळावर लढवेल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तर भाजपाचे नेते सकाळी स्वप्न पाहतात आणि बोलतात, आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, जे सत्तेसाठी भाजपात गेले होते, ते सध्या अस्थिर आहे, ते सत्ताधारी नेत्यांच्या संपर्कात आहे, त्या लोकांना आशेवर ठेवण्यासाठी भाजपा नेते बोलत असतात. भाजपामधून ज्यांना बाहेर पडायचं त्यांना रोखण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत. भाजपातील अनेक नेते सत्ताधारी पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत. राष्ट्रवादीतून जे जे लोक गेले त्यातील बरेच लोक पुन्हा परतण्याच्या स्थितीत आहे असा पलटवार राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर केला आहे.

मुख्यमंत्र्यांनाही त्याभेटीची कल्पना - राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ती भेट गुप्त नव्हती. शिवेसेनेत गुप्त बैठका वगैरे होत नाहीत. मुलाखतीबाबत ती भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही, असे सांगतानाच या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला.

आदित्यला अडचणीत आणणाऱ्यांसोबत जायचे कशाला?; शिवसेनेतील सूर

ज्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांनी अडचणीत आणले, मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून काम करतात, अशी टीका केली; त्यांच्यासोबत सत्तेत जायचे कशाला, असा सूर शिवसेनेत दिसत आहे.

महाविकास आघाडीत चलबिचल

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यातील शनिवारच्या ‘लंच पे चर्चा’वरून महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. पंचतारांकित हॉटेलात फडणवीस आणि राऊत यांच्यात शनिवारी चर्चा झाली. ही दोन तासाची ही भेट केवळ मुलाखतीसाठी होती असा खुलासा दोन्ही बाजूंनी केला. मात्र, या भेटीमुळे नव्याने राजकीय समीकरणांची मांडणी होणार का, शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा जवळीकीचे प्रयत्न सुरू आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पवार यांनीही फडणवीस-राऊत भेटीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

सरकार पडेल तेव्हा बघू - फडणवीस

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार आहे. ते कोसळेल तेव्हा पयार्याबाबत विचार करू. मात्र, आम्हाला सरकार बनविण्याची घाई नाही. शिवसेनेसोबत कसलीही राजकीय चर्चा नाही. राऊत यांच्याशी भेट केवळ मुलाखतीसंदर्भात होती. कोरोनासह विविध कारणांमुळे राज्यातील सरकारविरोधात नाराजी आहे. लोकांमध्ये इतका आक्रोश असेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळे 'त्या' भेटीचे टायमिंग चुकल्याचे म्हणता येईल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगितले.

Read in English

Web Title: "Conditions for holding mid-term elections in the state"; BJP leader Chandrakant patil claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.