शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: जेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, "विदर्भ माझं आजोळ, ते महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 5:51 PM

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: आधी राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती करावी, आम्ही लगेच मंडळांना मुदतवाढ देऊ, असं यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.

ठळक मुद्देआधी राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती करावी, आम्ही लगेच मंडळांना मुदतवाढ देऊ, असं यापूर्वी म्हणाले होते पवारविदर्भ वेगळा होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी विकास महामंडळाची स्थापना तातडीनं करण्याची मागणी करत भाजपनं मुख्यमंत्र्यांनी विदर्भ हे त्यांचं आजोळ असल्याची आठवण करुन दिली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका असं म्हटलं. "विदर्भ माझं आजोळ आहे. मी विसरलो नाही. पण माझं आजोळ माझ्यापासून तोडण्याचा मनात सुरू असलेला विचार पहिले सोडून द्या. विदर्भ वेगळा होणार नाही आणि तो मी होऊनही देणार नाही. विदर्भाला एकत्रित ठेवूनच त्याच्यासोबत महाराष्ट्राटा विकास केल्याशिवाय राहणार नाही. फक्त विदर्भाचा कणव आणायचा, मला माझ्या आजोळची आठवण करून द्यायची. माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

मुदतवाढीवरून वातावरण तापलं

वित्तमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या मांडल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी या मागण्यांमधील रकमेचं आणि ८ मार्चला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातील निधीचं समन्यायी वाटप राज्यपालांच्या सूत्रांनुसार होणार आहे का, अशी विचारणा केली होती. तसंच विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची जोरदार मागणीही केली. मंडळांना राजकीय डावपेचात अडकवू नका, असंही ते म्हणाले होते. त्यावर, अजित पवार यांनी मंडळांना मुदतवाढ देण्याची आमची भूमिका आहे, असं सांगतानाच आधी राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती करावी, आम्ही लगेच मुदतवाढ देऊ, असं विधान केलं होतं.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटVidarbhaविदर्भAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे