शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

“सरकारनं पुढे येऊन चर्चा करावी, मी मदत करण्यास तयार”; आमदार नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांना ग्वाही

By प्रविण मरगळे | Published: November 06, 2020 12:51 PM

BJP Mla Nitesh Rane, CM Uddhav Thackeray News: महाराष्ट्र सरकारने या स्टडी मॉडेल आणि अंमलबजावणीवर पुढे येऊन चर्चा करायला हवी. पण राजकारण पहिलं येतं असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देपरवडणारी सिनेमागृह सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री बोलले, पण मी ते याआधीच माझ्या मतदारसंघात सुरु केलं आहे२ वर्षापूर्वी देवगड येथे पहिला कंटेनरमध्ये सिनेमागृह सुरु करण्यात आला आहे.महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्राचा आनंद घेता यावा यासाठी ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न - मुख्यमंत्री

मुंबई – सिनेमा आणि नाटक हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं, कारण समाजात ते आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पाहायला मिळते, महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी पुढाकार घेईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

मुख्यमंत्र्याच्या या विधानावर भाजपा आमदार नितेश राणेंनी भाष्य केले आहे, नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलंय की, परवडणारी सिनेमागृह सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री बोलले, पण मी ते याआधीच माझ्या मतदारसंघात १ सिनेमागृह सुरु केलं आहे, २ वर्षापूर्वी देवगड येथे पहिला कंटेनरमध्ये सिनेमागृह सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने या स्टडी मॉडेल आणि अंमलबजावणीवर पुढे येऊन चर्चा करायला हवी. पण राजकारण पहिलं येतं, मी मदत करायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

पहिले कंटेनर थिएटर देवगडात साकार

साधारण शंभरएक प्रेक्षक बसतील इतकी आसनक्षमता, संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, सर्वोत्तम दर्जाचे साऊंड प्रूफ तंत्रज्ञान आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, असे सर्व सुविधायुक्त, परिपूर्ण 'कंटेनर थिएटर' कोकणातील स्थानिकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे हे थिएटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिथे बसवता येऊ शकते. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडनंतर सावंतवाडी येथेही कंटनेर थिएटर उभारण्यात येत आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मनोरंजन हे एकमेव असे माध्यम आहे जिथे आपण आपले दु:ख काही वेळाकरिता का होईना विसरुन जातो. मनोरंजन क्षेत्र मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे काम करीत असते. या क्षेत्रामुळे एक चांगला समाज घडण्यास मदत होत असते. त्यामुळेच महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्राचा आनंद घेता यावा यासाठी ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. राज्य शासनाचा एखादा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकार हे एक उत्तम माध्यम आहे. कारण जनमानसात कलाकारांची लोकप्रियता आणि त्यांच्या मनातील स्थान असते. त्यामुळे महाराष्ट्रातील कलाकारांच्या पाठिशी राज्य शासन कायम उभे असून कलाकारांना बळ देण्याचे काम करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच हिंदी आणि इतर भाषांबरोबरच मराठीतही उत्तम चित्रपट बनत असतात. पण काही वेळा एकाच दिवशी अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहातले शो (खेळ) मिळत नाही आणि पर्यायाने या चित्रपटांचे नुकसान होते. त्यामुळेच मराठी चित्रपटांसाठीही पुरेशा प्रमाणात शो राखीव ठेवण्याबाबत राज्य शासन आग्रही असेल, मागील अनेक वर्षात या क्षेत्रातून अनेक कलाकार घडले. याच क्षेत्रामुळे अनेकांना रोजगारही मिळाले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या चित्रीकरणासाठी चांगली जागा विकसित करणे, नव नवीन तंत्रज्ञान आणणे यासाठी प्रयत्न केले जातील. मुंबईत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचे येणाऱ्या काळात दर्जोन्नती करण्यावर भर असेल. आज देशासह राज्यावरही कोविड-19 चे संकट आहे. गेल्या आठ महिन्यानंतर आजपासून सिनेमागृहे व नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेसह सुरु होत आहेत. त्यामुळे या क्षेत्राला बळकटी देत असताना प्राधान्याने कोणती कामे करण्याची आवश्यकता आहे हे ठरविणे आवश्यक असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcinemaसिनेमा