शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 11:26 PM

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई:मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. भाजप खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने आम्हाला चर्चेचे निमंत्रण दिले आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे आम्हीही सरकारला सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत, असे संभाजीराजे यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे. (cm uddhav thackeray and sambhaji raje likely to meet on thursday over maratha reservation)

मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवार, १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक बोलविली आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीत संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार असून, यावेळी संभाजीराजे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख समन्वयकही या बैठकीस उपस्थित असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. 

“मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का?”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे आवाहन 

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षणासंदर्भातील मूक आंदोलनात उपस्थिती लावत संभाजीराजेंना मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे आवाहन केले होते. यावर, राज्य सरकारने चर्चेचे आमंत्रण दिले असले तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडचे नियोजित आंदोलन होणारच आहे. सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यास नाशिकचे आंदोलन विजयोत्सव म्हणून साजरा करू, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. 

“आमच्याकडे चावी आहे, त्यानं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू”; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींनी भूमिका स्पष्ट करावी 

मला उपमुख्यमंत्री अजित पवार भेटून गेले. त्यांनी मागण्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. घटनेत आतापर्यंत अनेक अमेण्डमेंट झाल्या. आता अजून एक करायला काय हरकत आहे? पंतप्रधानांसमोर आणखी एकदा हा विषय गेला पाहिजे. पंतप्रधानाचे विचार काय ते स्पष्ट झाले नाहीत. त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीState Governmentराज्य सरकारMumbaiमुंबईkolhapurकोल्हापूर