“मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का?”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 08:37 PM2021-06-16T20:37:57+5:302021-06-16T20:38:49+5:30

obc reservation: भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का, असा सवाल केला आहे.

bjp pravin darekar criticised on chhagan bhujbal over obc reservation | “मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का?”

“मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का?”

Next

मुंबई: आरक्षण वाचविण्यासाठी मराठा समाज आक्रमक झालेला असतानाच, राजकीय आरक्षण टिकावे म्हणून इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) वतीने आक्रोश आंदोलन सुरू करण्यात येत आहे. यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का, असा सवाल केला आहे. (bjp pravin darekar criticised on chhagan bhujbal over obc reservation)

राजकीय आरक्षण कायम राहावे म्हणून आघाडी सरकारने पाठपुरावा सुरू केला. मागासावर्ग आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करून प्रक्रिया सुरू केली असली, तरी इतर मागासवर्ग समाजात आरक्षण रद्द झाल्याने असंतोष असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले होते. यावरून प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. 

राजीनामा देण्याचं धाडस दाखवणार का?

मंत्री छगन भुजबळ यांच्या संघटनेने सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला, याचा अर्थ त्यांचा सरकारवर विश्वास नाही! OBC च्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण साधण्याचा हा प्रयत्न असून, मुख्यमंत्र्यांनी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर पदाचा राजीनामा देण्याचं धाडस दाखवणार का?, अशी विचारणा दरेकर यांनी केली आहे. 

“आमच्याकडे चावी आहे, त्यानं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू”; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

एकतर सरकारवर विश्वास नाही किंवा..

सरकारमधीलच मंत्री व त्यांचीच संघटना आंदोलनासाठी उतरते, याचा अर्थ एकतर सरकारवर विश्वास नाही किंवा सरकारकडून काम करून घ्यायचे नाही. आपल्याल तो मुद्दा म्हणून त्या ठिकाणी आपले राजकारण करायचे, असा याचा स्पष्ट अर्थ होतो. जो सरकारशी संबधित प्रश्न आहे, ज्या सरकारचा भुजबळ एक भाग आहेत. त्यांनी सरकारमध्ये बसून कॅबिनेटमध्ये बसून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढायला पाहिजे. परंतु या ठिकाणी सरकारशी चर्चा होत नाही. कुठलाही ताळमेळ दिसत नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे. 

“महिलांचा सन्मान करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठेय? सत्तेपाई सत्व गमावले”; भाजपचा आरोप

दरम्यान, मराठा समाजाचे आरक्षण टिकावे म्हणून सरकारच्या पातळीवर जी धावपळ दिसते तशी इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत दिसत नाही. समाजाचा आक्रोश समोर आणण्याच्या उद्देशानेच आंदोलन करण्यात येणार असल्याचे भुजबळांनी म्हटले होते. 
 

Web Title: bjp pravin darekar criticised on chhagan bhujbal over obc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app