शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

हात धुवा सांगण्यापलिकडे मुख्यमंत्री काय करतात? उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिले रोखठोक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 10:37 AM

CM Uddhav Thackrey interview by Sanjay Raut: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या रामप्रहरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना फोडत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. याला वर्ष होत नाही तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या रामप्रहरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना फोडत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्रपदाची शपथही घेतली होती. मात्र, शरद पवार यांच्या स्ट्राईकमुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परतले होते. याला वर्ष होत नाही तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो देखील राऊत यांनी रिलीज केला आहे. 

 महाविकास आघाडीला वर्ष पूर्ण होत आहे. ही मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या अभिनंदन मुलाखतीचा प्रोमो पोस्ट करताना राऊत यांनी उद्या धमाका असे कॅप्शन दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे देखील काही प्रश्नांवर बिचकल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. 44 सेकंदांचा हा प्रोमो आहे. 

मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारावजा उत्तर दिले आहे. यावर त्यांनी ''ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन'', असा इशारा दिला आहे. 

हे असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका, कारण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. कोणी कितीही आडवे आले त्या आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे. 

प्रोमोमधील काही प्रश्नकसं वाटतं आपल्याला?...मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे. महाराष्ट्र मोठे राज्य आहे. महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? तुमच्या जिवनात वर्षभरात काय बदल झाले? असे प्रश्न या प्रोमोमध्ये दाखविण्यात आले आहेत. 

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षपूर्तीचा कामांचा अहवाल लोकांपुढे लवकरच ठेवला जाईल असे सांगितले होते. तो अहवाल याच मुलाखतीतून मुख्यमंत्री मांडणार तर नाहीत ना, अशी उत्सुकताही अनेकांना लागली आहे. दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपाने टीका केली होती. तसेच नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील भाजपा नेत्यांची तक्रार केली होती. महाविकास आघाडीविरोधात भाजपा नेत्यांच्या चाललेल्या कुरघोड्या, त्यांना हात धुन्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा आदी या मुलाखतीचा मूळ भाग असण्याची शक्यता आहे.  

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा