शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

फोन टॅपिंग प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा संताप, कॅबिनेटमध्ये केले मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 20:41 IST

CM Uddav Thackeray's reaction on phone tapping issue : फोन टॅपिंगवरून केलेल्या दाव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या प्रकरणात विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक होत आहे.

मुंबई - परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेले गंभीर आरोप आणि नंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी फोन टॅपिंगवरून केलेल्या दाव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या प्रकरणात विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक होत आहे. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणाचे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद उमटले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत मोठे विधान केले आहे.  (Chief Minister Uddav Thackeray anger over phone tapping issue, big statement made in cabinet, said ...)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फोन टॅपिंग प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. यावेळी फोन टॅपिंग प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो. फोन टॅप होत असतील तर कामं करायची कशी आणि अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा कसा, अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच देवेंद्र फडवणीस यांनी केलेले आरोप आपण एकजुटीने खोडून काढले पाहिजेत, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  

दरम्यान, आजच्या कॅबिनेटला गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाची माहिती कॅबिनेटला दिली. काही अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्या असून, त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितल्याची माहिती कॅबिनेटच्या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी दिली. 

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. रश्मी शुक्लांनी वेगळ्याच नाव्यांनी परवानग्या घेऊन अनेक मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील त्यांनी दिला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस