मुख्यमंत्री ४०० कोटी रूपये खर्चून वडिलांचे स्मारक उभारतायत, आधी त्यांना प्रश्न विचारा; भातखळकरांचा रोहित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 06:59 PM2021-04-29T18:59:41+5:302021-04-29T19:16:26+5:30

नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल रोहित पवारांनी केला होता. त्यांच्या प्रश्नावर निशाणा साधत भातखळकर यांनी जोरदार टीका केली.

Chief Minister is erecting a monument to his father at a cost of Rs 400 crore. Ask him questions first; Bhatkhalkar's tola to Rohit Pawar | मुख्यमंत्री ४०० कोटी रूपये खर्चून वडिलांचे स्मारक उभारतायत, आधी त्यांना प्रश्न विचारा; भातखळकरांचा रोहित पवारांना टोला

मुख्यमंत्री ४०० कोटी रूपये खर्चून वडिलांचे स्मारक उभारतायत, आधी त्यांना प्रश्न विचारा; भातखळकरांचा रोहित पवारांना टोला

googlenewsNext
ठळक मुद्देनवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, रोहित पवारांनी केला होता सवालप्रत्येक गोष्टीचे गांभीर्य पाहून त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवावा लागतो, रोहित पवारांचं वक्तव्य

संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. मात्र, ठाकरे सरकारने १ मेपासून कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे सर्वांचे लसीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे दिल्लीत नवी संसद भवनाचे काम जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला होता. दरम्यान, यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

"मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा रोहित पवारजी. आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी," असं म्हणत भातखळकरांनी रोहित पवारांवर टीकेचा बाण सोडला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित पवारांवर टीका केली.

 Covishield पाठोपाठ Covaxin लसीचे दरही कमी; भारत बायोटेकने केली महत्त्वाची घोषणा

काय म्हणाले होते रोहित पवार?

"प्रत्येक गोष्टीचे गांभीर्य पाहून त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. त्यानुसार आज देशाची प्राथमिकता काय आहे, याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणे ही खऱ्या अर्थाने आजची प्राथमिकता आहे. त्यासाठी राज्य सरकारे अडचणीत असतानाही हजारो कोटी रुपयांचा भार उचलून लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे केंद्र सरकार लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून 'सेंट्रल विस्टा' प्रकल्पाचा भार उचलत आहे. आज हे अपेक्षित नाही आणि योग्यही नाही," असं ट्वीट करत रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Web Title: Chief Minister is erecting a monument to his father at a cost of Rs 400 crore. Ask him questions first; Bhatkhalkar's tola to Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.