Chhatrapati sambhaji raje: नाराज संभाजी राजेंची उद्या जाहीर पत्रकार परिषद; काय भूमिका घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 22:09 IST2021-05-27T22:08:35+5:302021-05-27T22:09:50+5:30
Maratha Reservation issue: राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी संभाजी राजेंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंनी मोदींची या आधी 40 वेळा भेट घेतली ते सांगितले नाही, त्यांना भाजपाने काय काय दिले ते सांगत नाहीत, असा आरोप केला.

Chhatrapati sambhaji raje: नाराज संभाजी राजेंची उद्या जाहीर पत्रकार परिषद; काय भूमिका घेणार?
मराठा आरक्षणावरूनभाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे (Chatrapati sambhaji raje) हे नाराज असून भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भेट नाकारली यावरून सुरु झालेले राजकारण त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याच्या वक्तव्यापर्यंत गेल्याने उद्याचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. छत्रपती संभाजी राजेंनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackreay) भेट घेतली आहे. (Chatrapati sambhaji raje will meet CM Uddhav Thackreay, BJP opposition leader Devendra Fadanvis.)
यावरून राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी संभाजी राजेंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंनी मोदींची या आधी 40 वेळा भेट घेतली ते सांगितले नाही, त्यांना भाजपाने काय काय दिले ते सांगत नाहीत, असा आरोप केला. यानंतर भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी संभाजी राजेंचा हेतू काही ठीक दिसत नाहीय, असे म्हटले होते.
छत्रपती संभाजी राजे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यानंतर ते सायंकाळी 5 वाजता जाहीर पत्रकार परिषद घेणार असून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार असल्याचे कळविण्यात आले आहे. यामुळे संभाजी राजे काय निर्णय़ घेतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.