शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

काँग्रेस आमदार उपोषणाला बसणार असतील तर...; मित्रपक्षाच्या नाराजीवर शिवसेनेचं सूचक भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 07:48 IST

विकास निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे आमदार नाराज

मुंबई: पुरेसा विकास निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे ११ आमदार नाराज असून ते लवकरच उपोषणाला बसणार आहेत. काँग्रेस आमदारांच्या नाराजीवर शिवसेनेनं 'सामना'मधून सूचक भाष्य केलं आहे. आमदार उपोषणाला बसणार असतील तर तो काँगेसचा प्रश्न. विरोधकांना हाती आयते कोलीत मिळेल व काँगेस नेतृत्वासमोरील अडचण वाढेल ती वेगळीच, अशा शब्दांत शिवसेनेनं सरकारमधील मित्रपक्षाच्या नाराजीवर सूचक विधान केलं आहे.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल याविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. आघाडीचे सरकार चालवणे ही एक कला आहे. त्यात ही नुसती आघाडी नसून महाविकास आघाडी आहे. त्यामुळे थोडे इकडे तिकडे होणारच, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. काँगेसच्या 11 आमदारांनी आता उपोषणास बसायचे ठरवले आहे. विकास निधीचे समान वितरण झाले नाही व निधी वाटपात पक्षपात झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे की, सरकारमध्ये काँगेसची उपेक्षा होत असून काँगेस एकाकी पडली आहे. याबाबत हे अकरा जण दिल्लीत जाऊन सोनिया गांधींकडे तक्रार करणार आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना या घटनांमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर तो त्यांचा भ्रम आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला आहे.

काँग्रेसच्या नाराजीवर काय म्हणते शिवसेना?- काँगेसचे महाराष्ट्रातील नेते विकास निधी संदर्भात जाहीरपणे काहीच बोललेले नाहीत. किंबहुना बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत यांसारखी नेते मंडळी सरकारमध्ये आहेत व सरकार पाच वर्षे चालवायचेच यासाठी ते शर्थ करीत आहेत. महाराष्ट्रातील 'आघाडी' सरकार चालावे व राज्यावरील राजकीय इडापीडा टळावी यासाठीच तीन पक्षांचे सध्याचे सरकार निर्माण झाले.- देशाची स्थिती तशी बरी नाही. खुद्द राष्ट्रीय काँगेस पक्षात अनेक कारणांनी अस्थिरता व अस्वस्थता आहे. देशात मोदींचे सरकार आहेच, पण एका सक्रिय विरोधी पक्षाची संसदीय लोकशाही व्यवस्थेत तितकीच गरज आहे. काँगेसने सध्या अशा मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावायला हवी असे जनमत तयार झाले आहे, पण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी काँगेसचे आमदार स्वतःच सहभागी असलेल्या सरकारविरोधात उपोषणाला बसत आहेत. - काँग्रेस आमदारांच्या उपोषणाचा पवित्रा ही लोकशाही वगैरे आहे हे मान्य, पण त्यामुळे ज्यांनी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरच अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल.- प्रत्येक मतदारसंघाचा विकास म्हणजेच राज्याचा विकास हे सूत्र मोडले ते मागच्या भाजप सरकारने. शिवसेनेसह सर्वच इतर पक्षांच्या आमदारांना डावलून फक्त भाजपच्याच आमदारांवर विकास निधीचा पाऊस फडणवीस सरकारने पाडला. त्यावरही टीका झालीच होती, पण टीकेची पर्वा करतील ते भाजपवाले कसले? 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाणAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस