शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाची दखल ६० दिवस होऊनही केंद्र सरकारने घेतलेली नाही - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 17:44 IST

Aditya Thackeray : कल्याण-डोंबिवली येथील पत्री पुलाच्या उद्धाटनानंतर आदित्य ठाकरे बोलत होते.

ठळक मुद्देकल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या पत्री पुलाचे आज लोकार्पण करण्यात आले.

कल्याण :  गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा या किसान सभेच्या मोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे, असे सांगत शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने किती दखल घेतली, अशी विचारणा केली आहे. 

कल्याण-डोंबिवली येथील पत्री पुलाच्या उद्धाटनानंतर आदित्य ठाकरे बोलत होते. "किसान मोर्चाच्या इथे कोणी फिरकलं नाही. यापेक्षा केंद्राने याची किती दखल घेतली आहे. याकडे आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नेतृत्व करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल बोलले आहेत," असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

याचबरोबर, या शेतकऱ्यांच्या मोर्चेला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र 60 दिवस झाले तरी केंद्राने याची दखल घेतलेली नाही, हा प्रश्न आपण विचारायला हवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच, जेव्हा मोर्चे येतात, तेव्हा मास्क घालणे गरजेचे आहे. कारण, अजून कोरोना संपलेला नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, कल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या पत्री पुलाचे आज लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यासाठी हिरवा कंदील दाखवला. यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. 

कंगनाला भेटायला वेळ असतो; पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही - शरद पवारमुंबईत आझाद मैदानात आयोजित किसान मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केले. यावेळी राज्याला इतिहासात पहिल्यांदाच असे राज्यपाल लाभले आहेत. हजारो शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात मोर्चा काढून मुंबईत दाखल झाले. या शेतकऱ्यांना राज्यपालांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन द्यायचे आहे. पण आमचे राज्यपाल गोव्याला गेले आहे. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही, असा टोला शरद पवारांनी राज्यपालांना लगावला.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली