शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी अडवलं तर आमदारांना फोन करा : हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने मोबाईल नंबर केले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 20:44 IST

पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरु केल्यापासून पुण्यातील काही संस्था संघटनांनी शहरातील वापराच्या सक्तीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

पुणे : पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरु केल्यापासून पुण्यातील काही संस्था संघटनांनी शहरातील वापराच्या सक्तीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.या हेल्मेटसक्तीच्या विरोधात येत्या गुरुवारी रॅली तर काढण्यात येणार आहेच पण त्याआधी शहरातील लोकप्रतिनिधींना थेट फोन करण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे. 

                           याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांनी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे महिनाभरापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आजपासून पोलिसांनी इ-चलन फाडण्यास सुरुवात केली. या विरोधात हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने घेतलेल्या बैठकीत सविनय कायदेभंग करत मोर्चा काढण्याचा  निर्णय घेतला. पण त्याच वेळी त्यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधी असलेल्या आठ आमदार व चार खासदार यांचे फोन नंबर व्हायरल केले आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना कृती समितीने सांगितले की, हे सर्व आमदार निवडून येण्यापूर्वी हेल्मेटसक्तीला विरोध करत होते. यावेळी मात्र कोणी एक शब्दही उच्चारलेला नाही. त्यामुळे विजय काळे सोडल्यास इतर आमदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. मात्र असे घडत नसल्याने त्यांचे मोबाईल नंबर समाजमाध्यमात दिले जात असून पोलिसांनी पकडल्यावर त्यांना फोन अगर एसएमएस करावा असेही सांगण्यात आले. अर्थात यामुळे आमदारांची डोकेदुखी वाढणार असून पुणेकरांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता नाकी नऊ येतील यात शंका नाही.  या बैठकीला माजी महापौर अंकुश काकडे, मोहनसिंग राजपाल, शांतीलाल सुरतवाला,संदीप खर्डेकर,विवेक वेलणकर,मंदार जोशी,धनंजय जाधव आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMLAआमदारtraffic policeवाहतूक पोलीसSocial Viralसोशल व्हायरल