शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

भाजपाची चिंता वाढणार; शिवसेना, अकाली दलापाठोपाठ अजून एक पक्ष एनडीएपासून दुरावणार?

By बाळकृष्ण परब | Published: September 23, 2020 7:45 AM

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत:ही निवडणूक लढवावी आणि जनतेमधून निवडून यावे, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलोकजनशक्ती पक्षाकडून १४३ जागांवर निडणूक लढण्याची तयारी सुरू लोकजनशक्ती पक्षाकडूनही चिराग पासवान यांना बिहार निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची पूर्ण तयारीबिहारमध्ये एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून अद्याप एकमत होऊ शकलेले नाही

पाटणा - बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये फूट पडण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात उघडपणे आघाडी उघडली असून, ते निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, लोकजनशक्ती पक्षाकडूनही चिराग पासवान यांना बिहार निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची पूर्ण तयारी केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकजनशक्ती पक्षाकडून १४३ जागांवर निडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत:ही निवडणूक लढवावी आणि जनतेमधून निवडून यावे, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये फूट पडणे निश्चित आहे. सध्या एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून अद्याप एकमत होऊ शकलेले नाही.

गेल्याच आठवड्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या बैठकीमध्ये लोकजनशक्ती पक्षाच्या खासदारांनी नितीश कुमार यांच्या कामांवर टीका केली होती. कोरोना, स्थलांतरीत मजूर आणि महापूर या मुद्द्यांवरून लोकजनशक्ती पक्षाच्या खासदारांनी जेडीयूवर टीका केली होती. तसेच बिहारमध्ये भाजपाने जास्त जागांवर निवडणूक लढवावी, अशी मागणीही या खासदारांनी केली होती.२०१५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकजनशक्ती पक्षाने ४२ जागांवर निवडणूक लढवली होती. चिराग पासवान यांच्याकडून यावेळीही तेवढ्याच जागांची मागणी करण्यात येत आहे. मात्र नितीश कुमार पासवान यांच्या पक्षाला एवढ्या जागा देण्यासाठी राजी नाहीत. तर भाजपाही बिहार विधानसभेमधील २४३ जागांपैकी १०० पेक्षा कमी जागांवर लढण्यास तयार नाही आहे. तसेच जेडीयूकडूनही ११० ते १२० जागांवर दावा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांच्या पक्षांना जागा कशा सोडायच्या हा प्रश्न आहे.बिहारी जनता नितीश कुमारांवर नाराज असल्याची चिराग यांनी केली होती टीकाबिहारमध्ये सत्ताधारी एनडीएमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू असून, रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. नितीश कुमार यांच्या कारभारावर बिहारमधील जनता नाराज असून, त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, असा दावा करत लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार चिराग पासवान यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातील नितीश सरकार कशाप्रकारे काम करत आहे आणि राज्यातील कोरोना विषाणूच्या फैलावाची सत्य परिस्थिती काय आहे, याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली होती. तसेच राज्यातील जनता बिहार सरकारच्या कामकाजावर तितकीशी समाधानी नसून, त्याचा परिणाम बिहार विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येईल, अशी शक्यता चिराग पासवान यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड

टॅग्स :Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBiharबिहारElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण