शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काेराेनाच्या महामारीत भाजपाचे राजकारण वाईट; नाना पटाेले यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 17:41 IST

Nana Patole criticize Bjp, Central Govenrnment on Corona Crisis: रायगड जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आज नाना पटोले दौऱ्यावर आले होते.

लाेकमत न्यूज नेटवर्करायगड : काेराेनाच्या महामारीत मदत करायचे साेडून भाजप (BJP) केवळ राजकारण करण्यात मग्न आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेबाबत काॅंग्रेसने पूर्व सुचना दिली हाेती. मात्र, माेदी सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. त्याचेच हे परिणाम असल्याचा आराेप काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटाेले (Nana patole) यांनी अलिबाग येथे केला. (Congress state president Nana Patole on alibag tour after Tauktae Cyclone hits kokan region.)

रायगड जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आज नाना पटोले दौऱ्यावर आले होते.यावेळी अलिबाग तालुक्यातील नवगाव, वरसोली , खानाव , वावे या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा त्यांनी केला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तौक्ते चक्रीवादळाने अपरिमित नुकसान केले आहे. शेतकरी , बागायतदार , मच्छीमार आणि घरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अद्यापही रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त भागात पंचनामे झालेले नसल्याचे समोर येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य पंचनामे करावेत. त्या नुकसानीचा आढावा योग्य प्रस्तावासह सरकारला सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांना केल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भाजपा कोरोनाला केवळ राजकीय मुद्दा बनवत पाहत आहे. उपाय योजना करून देशातील जनतेला धीर देणे गरजेचे आहे.

अहंकारामुळे देशाला स्मशानभूमी बनविण्यावर भाजप सरकारने भर दिला आहे असा घणाघातही त्यांनी केला. कोणता पक्ष विदूषक आणि कोणता पक्ष नायक याबाबतचा कौल पश्चिम बंगालच्या जनतेने दिला आहे. त्यामुळे अन्य राज्यातील निवडणूकांमध्ये काँगेस पक्षच देशाचा हिरो असल्याचे प्रमाणपत्र जणताच देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी खासदार हुसेन दलवाई , प्रदेश चिटणीस राजन भोसले , सुदर्शन पांडे , आबा दळवी ,  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप , महिला जिल्हाध्यक्ष ऍड. श्रद्धा ठाकूर , ऍड. जे. टी. पाटील, ऍड. प्रवीण ठाकूर, अलिबाग तालुकाध्यक्ष योगेश मगर , युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. प्रथमेश ठाकूर , ऍड. कौस्तुभ पुनकर , आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळRaigadरायगडBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या