शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

महाविकास आघाडीला भिडण्यासाठी भाजपची रणनीती; 'समर्थ बूथ अभियान' घेणार हाती; 'असा' असणार प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 08:28 IST

५१ टक्के मतांसाठी भाजपचे अभियान; मनसेच्या इंजिनाची विशिष्ट ठिकाणी मदत

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर किमान ५१ टक्के मते मिळविण्यासाठी प्रदेश भाजपने समर्थ बूथ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १७ सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवशी समर्पित करण्यात येणार आहे.पाच बूथमागे एक शक्ती केंद्र प्रमुख नेमण्यात येत आहेत. स्थानिक सामाजिक समीकरणानुसार नावे निश्चित केली जातात. प्रत्येक बूथवर भाजपचे प्रमुख पदाधिकारी बैठक घेतात आणि तेथे मतदार यादीचे वाचन केले जाते. त्याची माहिती प्रदेश भाजप कार्यालयास पाठवावी लागते. प्रदेश भाजपच्या मुंबईतील कार्यालयात या संपूर्ण अभियानासाठी वॉर रूम असून तेथे ३५ जणांची टीम काम करीत आहे, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी दिली.‘आमच्या गाडीला यापुढे एकच इंजिन राहील’, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा संबंध मनसेला सोबत घेण्याशी जोडला गेला. प्रत्यक्षात भाजपने पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले होते. मात्र, शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेची मदत मुंबई, पुणे, नाशिक व ठाणे महापालिकेत घेतली जाऊ शकते, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.२५ लाख युवा वॉरिअर्स१८ ते २५ वर्षे वयोगटातील युवकांनी ‘युवा वॉरिअर’ अशी पाटी हातात घेऊन सेल्फी काढायचा आणि त्यासह नोंदणी करण्याचे अभियान सध्या सुरू आहे. २५ लाख युवा वॉरिअर नोंदण्याचे उद्दिष्ट आहे.२०१९मध्ये सर्वाधिक मते२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रितपणे लढले होते. भाजपला राज्यात सर्वाधिक २५.७५ टक्के मते मिळाली होती व १०५ आमदार निवडून आले होते. शिवसेनेला १६.४१ टक्के इतके मतदान झाले होते आणि ५६ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीला १६.७१ टक्के मते आणि ५४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने १५.८७ टक्के मतांसह ४४ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होती. अर्थात, चारही प्रमुख पक्ष युती आघाडी करून लढल्याने प्रत्येकाची स्वतंत्र मतशक्ती किती हे समोर येऊ शकले नव्हते.मुंबई पालिकेतील मतेमुंबई महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत शिवसेना-भाजप राज्यात सत्तेत एकत्र असूनही वेगवेगळे लढले होते. शिवसेनेला ८४ जागा आणि १४,४३,९६९ मते मिळाली होती. भाजपला ८२ जागा आणि १३,९२,६७६ मते मिळाली होती.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMNSमनसे