टगेगिरी हीच संस्कृती; महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे का? भाजपाचा काँग्रेसला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 16:00 IST2020-08-09T16:00:00+5:302020-08-09T16:00:47+5:30
टगेगिरी हीच महाभकास आघाडीतील मित्र पक्षांची संस्कृती असल्याचा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला आहे.

टगेगिरी हीच संस्कृती; महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे का? भाजपाचा काँग्रेसला सवाल
मुंबई – अधिकारी ऐकत नसतील तर दंगा घाला या काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विधानावरुन राज्यात विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. तुमची कामे होत नसतील तर दंगा घाला. बिल्कुल दंगा करा. भीक मागितली तर कोणी देत नाही. आपला अधिकार आहे, हिसकावून घ्या. आम्ही येऊन तालुका सांभाळायचा तर तुम्ही काय सांभाळायचे असा अजब सल्ला यशोमती ठाकूर यांनी सोलापूरात कार्यकर्त्यांना दिला आहे.
मात्र या सल्ल्यावरुन भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस मंत्र्याना सवाल विचारला आहे. यात म्हटलं आहे की, कामं होत नसतील तर दंगा करा, मंत्री यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना सल्ला तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात, कार्यकर्त्यांनी धाक निर्माण करण्यासाठी समूहाने शासकीय कार्यालयात जावे. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच टगेगिरी हीच महाभकास आघाडीतील मित्र पक्षांची संस्कृती असल्याचा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला आहे.
टगेगिरी हीच महाभकास आघाडीतील मित्र पक्षांची संस्कृती... https://t.co/w9mIJ2SMDd
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 9, 2020
सोलापूरच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये शनिवारी कोरोना विषाणूच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात सोलापुरात आले होते. या दरम्यान सोलापूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठकही घेण्यात आली. यावेळी ठाकूर बोलत होत्या. कोणत्याही तालुकाध्यक्षाने तक्रार करू नये. तुम्ही तुमचा तालुका सांभाळायला पाहिजे. तुम्ही सांभाळा, तुम्हाला ताकद देण्याचे काम आम्ही करू, असे वक्तव्य ठाकूर यांनी केले. यानंतर बाळासाहेब थोरातांनी सांगितले की, अधिकाऱ्यांवर आपलाही धाक असायला हवा. जनतेचा प्रशासनावर धाक हवा. कार्यकर्त्यांनी दोन चार पोरं सोबत घ्या असे वक्तव्य केलं होतं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य
रहस्यमय! एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले; हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु
कुटुंबाने ज्या व्यक्तीला मृत समजून दफन केले ‘तो’ पुन्हा जिवंत परतला; पोलिसांनाही बसला धक्का
कोरोनाचं संकट दूर झाल्यावर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल; कर्नाटकच्या मंत्र्यांचा दावा
बेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा