“चणेवाला बोलतो तसं भाषण, महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव की...; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका”

By प्रविण मरगळे | Published: March 3, 2021 06:09 PM2021-03-03T18:09:57+5:302021-03-03T18:12:13+5:30

BJP Nilesh Rane Criticized CM Uddhav Thackeray over Speech in Assembly Session: भाजपा नेते निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून सडकून टीका केली आहे.

BJP Nilesh Rane Target CM Uddhav Thackeray Speech in Maharashtra Assembly Budget Session | “चणेवाला बोलतो तसं भाषण, महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव की...; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका”

“चणेवाला बोलतो तसं भाषण, महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव की...; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका”

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी सभागृहात विरोधकांनी घातला गोंधळएकेरी भाषेत उल्लेख केल्यानं मुख्यमंत्र्यांनी मध्येच भाषण थांबवलं, संसदीय कामकाज मंत्र्यांनी घेतली हरकत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मागितली दिलगीरी

मुंबई – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली, कोरोनापासून, राम मंदिर आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांवर टीकेचे बाण सोडले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही खंडणीबहाद्दर, चौकातलं भाषण, सैन्याचा अपमान म्हणत ठाकरे सरकारवर पलटवार केला.(BJP Nilesh Rane Target CM Uddhav Thackeray over speech in Maharashtra Vidhansabha budget Session)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना खडेबोल सुनावल्यानंतर भाजपा नेत्यांनीही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे, यातच माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवत ट्विटरवरून निशाणा साधला, निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलंय की, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी सभागृहात फूटपाथवरचा चणेवाला जसा बोलता तसं भाषण केले, यांची लायकी ग्रामपंचायतीमध्ये बोलण्याइतकी पण नाही, पण दुर्दैव म्हणावं महाराष्ट्राचे, की राज्यातील जनतेला अशा बिनडोक व्यक्तीला सहन करावं लागत आहे. अशा खालच्या शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगीरी

विधानसभेत सभागृहात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, यावेळी एका नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी भाषेत उल्लेख केला, तेव्हा सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी गदारोळ घातला, मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण थांबवलं तेव्हा संसदीय कामकाज मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी या मुद्द्यावरून हरकत नोंदवली, विरोधी पक्षाच्या कोणत्याच नेत्यांच्या भाषणा दरम्यान व्यत्यत आणला नाही, तशीच अपेक्षा आताही नाही, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख गंभीर आहे अशी हरकत अनिल परबांनी घेतली, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी त्वरीत उभं राहत मुख्यमंत्री यापदाचा आम्हाला आदर आहे, त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असेल तर मी दिलगीरी व्यक्त करतो, त्यानंतर सभागृहातील वातावरण निवळलं, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली.

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे काही  शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व 'येर गबाळे' पळून गेले होते. एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले होते. त्यामुळे भाजपनं हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये. जम्मू-काश्मीरमध्ये युती करताना भाजपचं हिंदुत्व कुठं गेलं होतं?" ज्या बाळासाहेबांची आठवण तुम्हाला आता होतेय. ज्या हिंदुत्वावर तुम्ही बोलत आहात. मग ज्या खोलीला आम्ही हिंदुत्वाचं मंदिर मानतो. त्या खोलीत अमित शहांनी दिलेलं वचन बाहेर आल्यावर तुम्ही निर्लज्जपणे नाकारता. याची लाज वाटायला हवी अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपावर निशाणा साधला.

Web Title: BJP Nilesh Rane Target CM Uddhav Thackeray Speech in Maharashtra Assembly Budget Session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.