Param Bir Singh: "वरुणचे 'वाझे'ले की बारा"; परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर भाजप नेत्याचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:11 PM2021-03-20T23:11:53+5:302021-03-20T23:15:16+5:30

bjp mla nitesh rane slams varun sardesai: भाजप आमदार नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना टोला; चार दिवसांपूर्वीच्या आरोपांची करून दिली आठवण

bjp mla nitesh rane slams varun sardesai after param bir singh makes allegations on anil deshmukh | Param Bir Singh: "वरुणचे 'वाझे'ले की बारा"; परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर भाजप नेत्याचा निशाणा

Param Bir Singh: "वरुणचे 'वाझे'ले की बारा"; परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर भाजप नेत्याचा निशाणा

Next

मुंबई: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. आयुक्त पदावरून दूर करण्यात आल्यानंतर सुट्टीवर गेलेल्या सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र लिहून राज्यात राजकीय भूकंप घडवला आहे. (Anil Deshmukh asked Waze to collect Rs 100 crore for him per month Param Bir Singh writes to CM Uddhav Thackeray)

परमबीर सिंग यांच्या पत्राचा ईमेल ऍड्रेस तपासला जाणार; मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रावरच शंका?

परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय अब्रुनुकसानीचा दावा दाखला करणार असल्याचं म्हटलं आहे.

षडयंत्र, ब्लॅकमेल अन् ८ महत्त्वाचे मुद्दे; गृहमंत्री देशमुखांचे परमबीर सिंगांना ४ प्रश्न

परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. डीजी पदावर कार्यरत असलेल्या सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजप नेते नितेश राणेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'आयपीएल बुकींकडून वसुली होत असल्याचा आरोप मी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत केला होता. वरुणचे 'वाझे'लेकी बारा', असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. (bjp mla nitesh rane slams varun sardesai)



काय म्हणाले होते नितेश राणे?
उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी सचिन वाझे यांच्यासोबत युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी चार दिवसांपूर्वी केली होती. वाझे यांनी आयपीएलमध्ये बेटिंग करणाऱ्या टोळ्यांकडून खंडणी मागितली होती. या खंडणीत सरदेसाई यांनी हिस्सा मागितल्याचा आरोपही राणे यांनी केला होता.

"आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता"

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचे रॅकेट चालतं. या सर्व बेटिंगवाल्यांना सचिन वाझे यांनी फोन करून मोठ्या खंडणीची मागणी केली होती. छापा किंवा अटक टाळायची असेल तर १५० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी वाझेंनी केली होती. वाझेंनी बेटिंगवाल्यांना फोन केल्यानंतर वाझेंना वरुण सरदेसाई यांनी फोन केला. तुम्ही बुकींकडे जे पैसे मागितले त्यातील आमचा हिस्सा किती? असं सरदेसाई यांनी वाझे यांना विचारल्याचा म्हणजे एक प्रकारे खंडणी मागितल्याचा आरोप राणे यांनी केला. त्यामुळे एनआयएने वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्ड, त्यांचे संभाषण आणि सीडीआर तपासावे, अशी मागणी राणे यांनी केली होती.
 

Web Title: bjp mla nitesh rane slams varun sardesai after param bir singh makes allegations on anil deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.