शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
3
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
10
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
11
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
12
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
13
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
14
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
15
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
16
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
17
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
18
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

"बाटला हाऊस एन्काऊंटरवर अश्रू ढाळणाऱ्या सोनिया गांधीचा वाण आणि गुण उद्धव ठाकरेंना लागलाय, म्हणूनच…’’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 5:09 PM

BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Shiv Sena: ८४ वर्षांचा एक गलितगात्र राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

मुंबई - भीमा-कोरोगाव खटल्यात आरोपी असलेले फादर स्टेन स्वामी यांचे नुकतेच रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झाले. स्टेन स्वामी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूसाठी सरकारला जबाबदार ठरवून समाजातील विविध लोकांकडून टीका होत आहे. दरम्यान, शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या सामनामधील एका लेखातून संजय राऊत यांनी स्टेन स्वामींच्या मृत्यूवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच ८४ वर्षांचा एक गलितगात्र राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. मात्र सामनातील या लेखावरून आता भाजपाने (BJP MLA Atul Bhatkhalkar ) शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Says, "Uddhav Thackeray has the qualities and qualities of Sonia Gandhi who shed tears at the Batla House encounter")

संजय राऊत यांनी लिहिलेल्या या लेखावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे या ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात, बाटला हाऊस एन्काऊंटरवर अश्रू ढाळणाऱ्या सोनिया गांधीचा वाण आणि गुण उद्धव ठाकरेंना लागला आहे. त्यामुळेच दलित आणि मुस्लिमांना सशस्त्र उठावाची ट्रेनिंग देण्याचा ठपका असलेल्या स्टेन स्वामीवर सामनाने छाती बडवली आहे. सामनात आज प्रसिद्ध झालेल्या लेखात स्टेन स्वामींचा उल्लेख ८४ वर्षांचा म्हातारा असा केला आहे. हे लाज कोळून प्यायले आहेत मतांसाठी, असा जळजळीत टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

स्टेन स्वामींच्या मृत्यूवरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले होते की, मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदींचे नाव प्रसिद्ध होत असताना मुंबईत फादर स्टेन स्वामी यांचा तडफडून आणि गुदमरून मृत्यू झाला. स्वामी हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत बऱ्याच काळापासून होते. त्यांचे वय ८४ वर्षे होते. त्यांना ऐकता, बोलता येत नव्हते. दिसतही नव्हते. त्यांचा श्वास पूर्णपणे मंदावला असताना त्यांना तुरुंगातच कोरोनाने गाठले. त्यांना जीवनाच्या अंतिम समयी झारखंडमध्ये मित्रांसमवेत वेळ घालवायचा होता. पण स्वामींवर दहशतवाद, फुटिरतावाद, राज्य उलथून लावण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप होता. ८४ वर्षांचा एक गलितगात्र राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय? अशा शब्दात राऊत यांनी मोदींवर टीका केली होती.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकर