शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Maratha Reservation : "...यांना काहीच झेपत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ", भाजपा आमदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 12:01 PM

Atul Bhatkhalkar : आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका सुरू केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित करत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ही लढाई पुढे कशी नेली जाणार, यावरही मुख्यमंत्री बोलले. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes to CM Uddhav Thackeray on Maratha Reservation)

आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे. 'यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, कळत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ. काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला...,' असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. याशिवाय, दुसऱ्या ट्विटमध्ये 'प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून,' असेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

("उद्धवजी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, हे नाटक का करत आहात?")

दरम्यान, मराठा आरक्षण कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यात कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राष्ट्रपतींचा असल्याचे म्हटले आहे. त्यावर बोट ठेवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा कायदा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही निशाणा साधला आहे. 'उद्धव जी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, असे नाटक तुम्ही का करत आहात? ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही आणि यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार आहात', असे म्हणत ट्विटद्वारे चंद्रकात पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधानांना माझी हात जोडून विनंती, मराठा आरक्षण द्या - उद्धव ठाकरेआरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि केंद्र सरकारला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आजच्या निकालात म्हटले असून आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. मुख्यमंत्री म्हणाले, शहाबानो प्रकरण, अ‍ॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संसदेने कायदा करून निर्णय बदलले. तेच मराठा आरक्षणाबाबतही करता येऊ शकते असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत राज्यातील सर्व पक्ष एकत्र आहेत आणि या समाजाला आरक्षण द्या, ही आमची एकमुखी मागणी आहे. या मागणीचे पत्र आपण उद्याच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवू आणि गरज पडली तर दिल्लीला जाण्याचीही आपली तयारी आहे. या न्याय्य मागणीचा पंतप्रधान अनादर करणार नाहीत, असा माझा विश्वास आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणchandrakant patilचंद्रकांत पाटील