शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

टिकैत यांचे अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत; नाना पटोले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 3:30 AM

पटोले यांचे बुधवारी दिल्लीहून नागपुरात आगमन झाले. विमानतळावर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत केले.

नागपूर : राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पण  शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या राकेश  टिकैत यांच्या डोळ्यातील अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत. मोदींना नटसम्राट व्हायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पटोले यांचे बुधवारी दिल्लीहून नागपुरात आगमन झाले. विमानतळावर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत केले.  यावेळी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, अन्नदाता हा प्रमुख घटक अहे. पण मोदींनी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकले. एवढी क्रूरता दाखविली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह संपूर्ण जनतेला आम्ही हे तीन काळे कायदे समजावून सांगू. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हे भाजपने देशाला शिकवू नये. पंतप्रधान मोदी लोकसभेत उभे राहून आंदोलनजीवी अशी उपरोधिक टीका करतात. ही नवी परंपरा त्यांनी सुरू केली. हे त्यांचे नवे देशप्रेम लोकांनी ओळखले आहे, अशी टीका त्यांनी केली.आपल्याला ऊर्जामंत्रिपद किंवा दुसरे कुठलेही मंत्रिपद मिळो न मिळो, पण माझ्या प्रदेशाध्यक्ष होण्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे. जनतेतही ऊर्जेचा संचार आहे व त्याचीच जास्त चर्चा होत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस नेहमीच आक्रमक राहील, असेही ते म्हणाले. विधान परिषदेतील १२ नियुक्त्यांसाठी न्यायालयात जाणारमहाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या १२ जागांसाठी नावे निश्चित करून यापूर्वीच राज्यपालांकडे पाठविली आहेत. मात्र, राज्यपालांनी दबावापोटी ती रोखून धरली आहेत. याविरोधात काँग्रेस न्यायालयात आव्हान देणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. पटोले म्हणाले....काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांनी विधानसभेची निवडणूक ईव्हीएमसह मतपत्रिकेवर घेण्याचा कायदा करावा, अशी विनंती राहुल गांधी यांना भेटून केली आहे. लॉकडाऊनच्या काळातील वीजबील कमी करून द्यावे, ही काँग्रेसची अपेक्षा आहे. सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी होतेय तर भाजपची आगपाखड कशासाठी ?उपमुख्यमंत्रिबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. विधानसभा अध्यक्षांची निवड अधिवेशनात होईल.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी