शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; नाराजी व्यक्त करणार, की...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 17:46 IST

Pankaja Munde and Narendra Modi meeting:नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या आहेत

नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) भेटीला गेल्या आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू असून, बैठकीत मुंडेसह विनोद तावडे(Vinod Tawade), विजया रहाटकरदेखील उपस्थित आहेत. आता पंकजा आणि मोदींमध्ये नेमकी काय चर्चा होते, याकडे सर्वांचेच लक्ष्य लागून आहे. 

पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार?

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet Expansion) पार पडला. त्यात महाराष्ट्रातून चर्चेत असलेल्या भाजप नेत्या प्रितम मुंडे(Pritam Munde) यांना डावलून राज्यसभा खासदार भागवत कराड(Bhagwat Karad) यांना मंत्रिपद देण्यात आले. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर आज भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठक बोलावली होती. त्यामुळे पंकजा मुंडे या दिल्लीत दाखल झाल्या होत्या. नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. 

पंतप्रधान साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या राष्ट्रीय सचिवांशी संवाद साधणार आहेत. आगामी उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींची या सचिवांशी चर्चा होईल. पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यावर यात चर्चा होऊ शकते.

'भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही'

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाराज असल्याच्या वृत्तांवर स्पष्टीकरण दिले होते.  भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडेंसह हिना गावित आणि इतरांचीही नावे चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असते. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असेच होते. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकंच मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

टॅग्स :PoliticsराजकारणPankaja Mundeपंकजा मुंडेNarendra Modiनरेंद्र मोदीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारPritam Mundeप्रीतम मुंडेVinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपा