"अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 01:04 PM2021-05-12T13:04:45+5:302021-05-12T13:07:37+5:30

सामना संपादकीयवरून भाजपचा टोला

bjp leader keshav upadhye slams shiv sena saamna editor sanjay raut sonia gandhi editorial after election | "अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले"

"अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले"

Next
ठळक मुद्देसोनिया गांधी यांनी घेतलेल्या बैठकीवर सामनातून करण्यात आलं होतं भाष्यसामना संपादकीयवरून भाजपनं लगावला जोरदार टोला

देशात नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. सर्वच ठिकाणी काँग्रेसला यश मिळालं नाही.  या निवडणुकांच्या निकालांचं आत्मचिंतन करताना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसमध्ये बदलांची आवश्यकता असल्याचं निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होत असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, शिवसेनेनं या बैठकीनंतर आपल्या सामनाच्या अग्रलेखात या बैठीतील काही मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. यावरून भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे. 

"करप्शन क्वीन ते सोनियाचा संदेश. अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले. कोलांटउडीचे बादशहा, करप्शन क्वीनला शरण," असं म्हणत केशव उपाध्ये यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या नावाचा उल्लेख न करता टोला लगावला. उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. यासोबत त्यांनी दोपहर का सामना आणि सामनाच्या आजच्या अग्रलेखाचे फोटो शेअर केले आहेत.काय म्हटलंय अग्रलेखात ?

सध्याच्या सरकारविषयी लोकांच्या मानात रोष निर्माण होतोय. बेरोजगारी, अर्थसंकट, महागाई, कोरोनामुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घसरणीला लागली. अशा वेळी देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ‘ट्विटर’च्या फांद्यांवरून उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे. पुन्हा मैदानावर उतरणे म्हणजे कोरोना काळात गर्दी करणे नाही. तर सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे, हे एक महत्त्वाचे काम सर्वच विरोधी पक्षांना रोज करावे लागेल. काँग्रेसने त्या कामी पुढाकार घ्यावा. सोनियांना बहुधा हाच संदेश द्यायचा असावा!

Web Title: bjp leader keshav upadhye slams shiv sena saamna editor sanjay raut sonia gandhi editorial after election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app