शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'तो' एक शब्द ठरतोय भाजप-मनसे युतीतला अडथळा? चंद्रकांत पाटील पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 11:59 IST

शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर भाजप नव्या भिडूच्या शोधात; मनसे-भाजप एकत्र येण्याची शक्यता

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चेनं पुन्हा जोर धरला आहे. याआधी राज आणि पाटील यांची पुण्यात बैठक झाली होती. त्यावेळी पाटील यांनी परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेचा मुद्दा राज यांच्याकडे उपस्थित केला होता. त्यावर माझ्या भूमिका स्पष्टच असतात, असं राज यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं.

उद्या राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. ही सदिच्छा भेट असणार असून दोन राजकीय नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होते, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राज ठाकरेंची परप्रांतीयांबाबतची भूमिका यासंदर्भात मी चर्चा करण्यासाठी त्यांना भेटणार आहे. सध्या युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही, मी एकटा निर्णय करणारा नाही. आमच्याकडे तीन निर्णयकर्ते आहेत, असं पाटील म्हणाले होते.

भाजपला राज ठाकरेंकडून 'व्यापक' भूमिकेची अपेक्षाआगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्यात चर्चा होणार असल्याचे समजते. मात्र, युतीचा कुठलाही प्रस्ताव नसून ही मैत्रीपूर्ण भेट आहे. उद्याच्या भेटीच विचारांचे आदान-प्रदान होणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. तत्पूर्वी भाजपचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज यांनी 'व्यापक' भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. त्यामुळे राज भाजपला अपेक्षित असलेली 'व्यापक' भूमिका घेणार का, याकडे लक्ष लागलं आहे.

आधी काय घडलं? माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर, पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भाषणाची क्लीप मी ऐकली असून लवकरच राज यांची भेट घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, ही भेट होत आहे. मला भाषणाची क्लीप मिळाली, ती त्यांच्या सहकाऱ्याने पाठवली की कुणी हे मलाही माहिती नाही. पण, भाषणाच्या क्लिपची आणि त्यांच्या भूमिकेची आम्ही नक्कीच चर्चा करू, असं पाटील यांनी सांगितलं.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपा