"संभाजीराजे, राज्य सरकारला वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का..?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 13:01 IST2021-06-11T12:59:24+5:302021-06-11T13:01:55+5:30
भाजपचे प्रदेशाधक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

"संभाजीराजे, राज्य सरकारला वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का..?"
कोल्हापूर: मोर्चा काढायचा रद्ध करून राज्य सरकारला वाचण्यासाठी आपण मदत करणार आहात का, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांना केला आहे. संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे. आधी मोर्चा काढतो म्हणाले. नंतर आमदार-खासदार यांना जाब विचारणार म्हटले. पुन्हा पुण्यातून मुंबईला लॉंग मार्च काढणार म्हणाले. तुम्ही नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे, असं पाटील म्हणाले.
आम्ही मोर्चा काढणार नाही. पण दुसरे कुणी मोर्चा काढत असतील, तर त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ असे आमदार पाटील यांनी म्हटले. खासदार संभाजीराजे यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे. आंदोलनात चालढकल केली तर ते समजण्याइतका मराठा समाज सुज्ञ आहे असाही गर्भित इशारा आमदार पाटील यांनी यावेळी दिला.