शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

"उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत, ते तर..."

By कुणाल गवाणकर | Published: November 25, 2020 3:34 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका

कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठीच जन्माला आलेले आहेत. पक्ष चालवणं आणि प्रशासन चालवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामावर टीका केली.“उद्या उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ अन् जयंत पाटलांचा ‘जपा’ असा उल्लेख व्हायला लागला तर...”जे खेचून नेतो, तो नेता, अशी नेत्याची सर्वसाधारण व्याख्या आहे. पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी वीज बिल वाढीच्या विषयाचा संदर्भ दिला. 'वीज बिलात सवलत देण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भूमिका होती. त्यांनी त्यासाठीची फाईल अर्थमंत्री अजित पवारांकडे पाठवली. निधी नसल्याचं म्हणत अजित पवारांनी ती फाईल मागे पाठवली. या ठिकाणी नेता म्हणून उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप करायला हवा होता. जनतेला दिलासा देणं आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे ५०० कोटी कमी करा. ते इथे वळवा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं,' असं पाटील म्हणाले.माझं नाव घेतल्याशिवाय मंत्री मुश्रीफ व जयंत पाटील यांना झोप येत नाही - चंद्रकांत पाटीलमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. 'एखाद्या विषयाची माहिती घेण्याची, मंत्रिमंडळाला घेऊन एका दिशेनं जाण्याची गरज त्यांना वाटत नाही. कारण ते प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठी जन्माला आलेले आहेत. पक्ष चालवलं आणि प्रशासनाचा गाडा हाकणं हे पूर्णत: वेगळे विषय आहेत. प्रशासन चालवताना तुम्हाला प्रचंड वेळ द्यावा लागतो. अनेक जुने संदर्भ घ्यावे लागतात. सर्वोच्च न्यायालयाच्या १०० निर्णयांचा अभ्यास करावा लागतो किंवा त्याबद्दलची माहिती संबंधितांकडून घ्यावी लागते,' असं पाटील यांनी सांगितलं.शरद पवारांबद्दल बोलताना जपून बोला; चंद्रकांतदादांच्या विधानावर फडणवीसांची भूमिकाप्रशासनाचा अनुभव आणि मनाची तयारी नसताना उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झाले, असंही ते पुढे म्हणाले. 'बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष संघटनेकडे लक्ष दिलं. ते लोकांच्या समस्या ऐकायचे आणि संबंधितांशी संपर्क साधून त्यांना मदत करायला सांगायचे. त्यांनी लोकांना वेळ दिला. उद्धव ठाकरेंनी तोच वारसा चालवला. कोणत्याही प्रभागातून निवडून येऊ शकत असतानाही ते कधी नगरसेवक झाले नाहीत. आमदार, खासदार झाले नाहीत. प्रशासकीय अनुभव नसताना ते थेट मुख्यमंत्री झाले,' असं पाटील म्हणाले. माझं उद्धव ठाकरेंशी वैयक्तिक भांडण नाही. उलट मैत्रीच आहे. मध्यंतरी विश्वासघात झाल्यानं फक्त आता भेटीगाठी कमी होतात, असं त्यांनी पुढे सांगितलं.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारNitin Rautनितीन राऊतBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना