शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

"वाझेंना वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने ९ वेळा विधानसभा स्थगित केली", चंद्रकांत पाटलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 12:30 PM

BJP leader Chandrakant Patil : सचिन वाझेंना वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने ९ वेळा विधानसभा स्थगित केली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरुन संसदेतही गदारोळ पाहायला मिळाळा. भाजपासह इतरही काही पक्षांच्या खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासह चौकशीची मागणी केली आहे. (BJP leader Chandrakant Patil criticized on state government and Anil Deshmukh)

अनिल देशमुख यांनी वसुली करण्यासाठी सचिन वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा रुजू केले होते. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शरद पवार यांना सुद्धा दिली होती, त्यासंदर्भात त्यांनी काय केले? असा सवाल करत मागील एक वर्षांपासून हा तमाशा सुरू आहे. तसेच, सचिन वाझेंना वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने ९ वेळा विधानसभा स्थगित केली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दुसरीकडे, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट उघडकीस येऊन त्याचे सर्व पुरावे गुप्तचर विभागाने सादर करुनही मुख्यमंत्र्यांनी त्यावर अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे फोन टॅपिंगचे आणि इतर सर्व सबळ पुरावे घेऊन आज दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटून याबाबतची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

("फोन टॅपिंगचे पुरावे घेऊन मी केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय", देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार)

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करा - अतुल भातखळकर या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा व परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच, त्यांनी याविरोधात मुंबईतील समता नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंगBJPभाजपा