शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

"घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 17:30 IST

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Corona Virus : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी महापौरांच्या विधानांवरून मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे. 

मुंबई - मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहरात कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती तर त्यांनी दिलीच पण नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या निष्काळजीपणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच बेजबाबदार नागरिकांमुळे करोनाचा धोका वाढत असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान आता भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी महापौरांच्या विधानांवरून मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे. 

"घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?" असं म्हणत अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा" असं म्हटलं आहे. 

मुंबईतील धार्मिक स्थळ पुन्हा एकदा बंद करण्याचा विचार पालिका करत असताना भाजप नेत्यांकडून त्यास विरोध केला जात आहे. याबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी निर्बंध झुगारणाऱ्यांनी राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या आरोग्याच्या काळजीचा विचार करावा अशी टीका केली आहे. "राज्याचे मुख्यमंत्री राज्याची एका कुटुंबाप्रमाणे काळजी घेत आहेत. लॉकडाऊन कुणालाच नकोय. पण वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कठोर निर्णय घेणं गरजेचं होऊन बसलं आहे. भाजपवाल्यांनी रस्त्यावर उतरून काम करावं मग त्यांना लक्षात येईल", असं रोखठोक मत पेडणेकर यांनी व्यक्त केलं. 

"सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं"

स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं. यावरून भाजपाने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. "सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं" असं म्हणत अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला. "सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन... निमंत्रण पत्रिकेतून 'हिंदुहृदयसम्राट' गायब, MMRDA चे मंत्री एकनाथ शिंदे गायब, ज्यांच्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शक्य झाले ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गायब... नावे फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची" असं म्हणत ठाकरे सरकारवर अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याAtul Bhatkalkarअतुल भातखळकरKishori Pednekarकिशोरी पेडणेकरMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे