शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 18:13 IST

Celebrity Tweet : सेलिब्रिटींना मेंदू नसतो का? असा सवाल राऊत यांनी केला होता

ठळक मुद्देसेलिब्रिटींना मेंदू नसतो का? असा सवाल राऊत यांनी केला होतासेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांनी दिले आदेश

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्वीट्सची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सेलिब्रिटींवर जोरदार निशाणा साधला होता. "सेलिब्रिटींना मेंदू नसतो का? तुम्हाला सेलिब्रिटी रस्त्यावरच्या याच लोकांनी केलं ना?, या गरीबांना जे समजतं ते तुम्हाला का समजत नाही?, तुम्हाला कोण वापरून घेतंय हे समजत नाही का?" सवाल संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला."सेलिब्रिटींना मेंदू नाही का हा प्रश्न फक्त देशाचा आवाज बुलंद करणाऱ्यांबाबत पडतो का? रिहानाचे समर्थन करताना हा प्रश्न का पडला नाही? तेव्हा तुमचा मेंदू सिल्व्हर ओकवर गहाण होता का संजय राऊत?," असं म्हणत भातखळकर यांनी राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्यावर टीका केली. ट्वीटच्या चौकशीचे आदेश गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात कुणाच्या दबावाखाली ट्वीट केले होते का, याची चौकशी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाकडून करण्यात येईल, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी काँग्रेसला दिलं.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याशी झूमवर संपर्क करून ‘त्या’ ट्वीटची चौकशी करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वूटला भारतीय सेलिब्रिटींनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षयकुमार, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आदींचा समावेश होता. अक्षयकुमार आणि सायनाच्या ट्विटमधील शब्दन् शब्द सारखे आहेत. तर अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या ट्वीटमध्ये मुंबई भाजपच्या उपाध्यक्षांचा उल्लेख केला आहे. या सेलिब्रिटींना भाजपने प्रवृत्त केले होते का, भाजपचा त्यांच्यावर दबाव होता का, या अनुषंगाने चौकशी व्हावी, अशी मागणी सावंत यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली होती. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरcongressकाँग्रेसBJPभाजपाTwitterट्विटरSachin Tendulkarसचिन तेंडुलकरLata Mangeshkarलता मंगेशकरSaina Nehwalसायना नेहवाल