शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे; भाजप नेत्याची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 16:49 IST

pooja chavan suicided case : जोरदार शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले होते

ठळक मुद्देजोरदार शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले होतेसमाजाला टाचेखाली चिरडणारी दबंग मानसिकता सारखीच, भाजप नेत्याची टीका

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झालेले राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड हे आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले होते. या प्रकरणात आरोप झाल्यानंतर सुमारे १५ दिवस बेपत्ता असलेले संजय राठोड हे आज सकाळी पहिल्यांदाच सर्वांसमोर आले. घरामधून बाहेर पडल्यानंतर ते पोहरादेवी येथे दर्शनासाठी रवाना झाले. दरम्यान, संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली झाली होती. तसंच घरातून निघाल्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफाही त्यांच्यासोबत होता. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी त्यांची तुलना गजा मारणेशी करत टोला लगावला."संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत. तो गुंड होता हे मंत्री आहेत एवढाच फरक.  समाजाला टाचेखाली चिरडणारी दबंग मानसिकता सारखीच आहे," असं म्हणत भातखळकर यांनी राठोड यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर हल्लाबोल केला. "जंगल मंत्री संजय राठोड पोहरा गडावर शक्तिप्रदर्शन करणार असतील तर संशयित गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने निरर्थक शक्ती कायद्याची टिमकी वाजवून नये. तसंच मुख्यमंत्र्यांनी घरबसल्या जनतेला उपदेश करणारे रटाळ फेसबुक लाईव्ह कार्यक्रम करू नयेत," असंही ते म्हणाले. काय केलं होतं गजा मारणेनं ?अमोल बधे आणि पप्पू गावडे या दोघांच्या खून प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर, गेल्या सोमवारी सायंकाळी मारणे याची मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. या वेळी त्याच्या हजारो समर्थकांनी तळोजा कारागृहासमोरच मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत आरडाओरडा केला. फटाके फोडण्याबरोबरच ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरणही केले. चित्रीकरण करीतच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन ४०० ते ५०० अलिशान गाड्यांमधून जंगी मिरवणूक काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोथरुडमध्ये मंगळवारी (दि. १६) रात्री गजा मारणे व समर्थकांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून हमराज चौकातील गणपती मंदिरात विनापरवाना आरती केली. यावेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. यानंतर गजा मारणेला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं होतं.

 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाPooja Chavanपूजा चव्हाणBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरTwitterट्विटर